पान:मेणबत्त्या.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०४



केल्याने बाजारी ओझोकिरीटच्या १०० भागांत पांढरें स्वच्छ मेण ८०-९० भाग सांपडते.
 अशा रीतींनी श्रुद्ध केलेले ओझोकिरीट मेणाचा रंग मधमाशांच्या उत्तम व शुद्ध केलेल्या मेणासारखा असतो. पण तें प्याराफीन मेणापेक्षा कमी व मधमाशांच्या मेणापेक्षा जास्त चकाकीत असते.
 गुणदोष-रसायनरीतीने ओझोकिरीट पदार्थाचे घटक दर शेकडा. ८१ भाग कार्बान व १५ भाग हायड्रोजन असे मिश्र असतात.
 गुण-१ याचे पातळ होण्याचे उष्णमान अधिक (१४०° फा. अंश ) असते, व त्यामुळे उष्ण हवेत याच्या मेणबत्त्या नरम होत नाहीत. २ या मेणाच्या केलेल्या मेणबत्त्या जळताना पांढरा व पुष्कळ प्रकाश पडतो. असा इतर पदार्थांच्या केलेल्या मेणबत्त्यांचा प्रकाश नसतो. ३ इतर पदार्थाच्या मेणबत्त्या जळतांना तीवरून जसे खाली ओघळ जातात, तसे याची मेणबत्ती जळतांना ओघळ जात नाहीत. ४ यास वाईट वास येत नाही व हे स्पर्शास किंचितही तेलकट लागत नाही ६ हे दिसण्यांत, उत्तम रीतीने स्वच्छ केलेल्या मधमाशांच्या मणा सारखे दिसते.
 दोष-याची मेणबत्ती विझल्यानंतर तिच्या वातीच्या प्याल्यांतील पातळ मेण ताबडतोब घट्ट होते. म्हणून त्या वातीची ठिणगी तशीच कायम रहाते व हळूहळू तिची रक्षा झाल्यानंतर ती ठिणगी नाहीसा होते. परंतु विशेष प्रकारच्या वाती तयार करून ओझोकिरटिच्या मेणबत्या बनविल्याने हा दोष नाहीसा करता येतो.