पान:मेणबत्त्या.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०३



 ओझेकिरीट गरमीने पातळ करून उर्ध्वपातन करण्याचे पात्रांत ठेवतात. त्या पात्रास खालून विस्तवाची उष्णता देतात. नंतर त्यांत अति उष्ण वाफ सोडून उर्ध्वपातनाने मेण काढून ग्राहक पात्रांत धरतात. या रीतीने निघालेल्या दर १०० भाग मेणांत पांढरें स्वच्छ मेण ५० भाग; काळे मेण ३५ भाग व तेल आणि तेलकट पदार्थ १६ भाग इतके पदार्थ मिश्र असतात. पांढया स्वच्छ मेणाचे पातळ होण्याचे उष्णमान १४०° फा. अंश असते, म्हणून त्या मिश्र पदार्थास प्रथम हायडालिक प्रेसमध्ये दाबून त्यांतील तेल व तेलकट द्रव्य निराळे केल्यानंतर तेवढी म्हणजे १४०° फा. अंशांची उष्णता देऊन तें पांढरें मेण निराळे करतात ; व त्याचे मोठाले गढे ओतून मेणबत्त्या करण्याकरितां कोठारांत सांठवितात. खाली राहिलेल्या काळ्या मेणाचें पातळ होण्याचे उष्णमान १७०° फा. अंश असते व त्याचा उपयोग । विद्युत् प्रतिबंधक कामाकडे करतात.
 ४ थी रीत-मि. पीलस्टिकर साहेबाची रीत--शिशाची कल्हई केलेल्या एका उघड्या कढईत ओझोकिरीट मेण घालून मंदोष्णतेवर । पातळ करून त्यांत दर शेकडा ३ भाग सलफ्युरीक आसीड मिळवितात. नंतर त्यास जोराने ढवळून खूप हालवितात. नंतर त्या अम्ल मिश्रणांत बेरीयम कार्बोनेट व कास्टीक सोड्याचा द्रव त्या अम्लास सम करण्या इतका मिळवितात. पुनः तें सर्व मिश्रण एकवार ढवळतात. नंतर ते स्थिर ठेवतात. स्थिर झाल्यावर त्यावर आलेलें मेण काढून घेतात. त्यास पुनः पाहिजे तर एकवार गरम पाण्यात टाकून पातळ करून स्थिर ठेवतात. वर जमलेले मेण काढून त्याचे मोठाले गढे ओतून मेणबत्त्या करण्यास्तव कोठारांत साठवतात. या प्रमाणे शुद्धीकरणविधी