पान:मेणबत्त्या.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०२




वर कोळशांतून गाळण्याची रीत लिहिली आहे. नंतर गाळून काढलेल्या मिश्रणांतील नेपथा पदार्थ उर्ध्वपातनाने निराळा करावा. म्हणजे खालीं शुद्ध व स्वच्छ मेण रहाते. त्याचे मोठाले गठे ओतून कोठारांत मेणबत्त्या करण्यासाठी सांठवून ठेवावे.
 २री रीत-एका नळिका यंत्रांत ( उर्ध्वपातनाचे पात्रांत) १०० भाग हे मेण घालावें. त्यांत वाफ निघत असलेले सलफ्युरीक आसीड ३-६॥ भाग मिळवावें. ते पात्र चोहोकडून बंद असते त्यास खाली हळूहळू उष्णता देऊन ती २५०° फा. अंशपर्यंत वाढवावी. नंतर त्या पात्रांत अति उष्ण* वाफ सोडून फार काळजीपूर्वक उर्ध्वपातन करावें.
 आसिडीफिकेशन नामक क्रियेने स्निग्ध पदार्थातील स्निग्ध आसिडेंकाढण्याच्या कामी जी भांडी वगैरे वापरतात व जशी क्रिया करतात तशीच भांडी वापरून व तशीच क्रिया करून वरील मिश्रणांतून शुद्ध व स्वच्छ ओझोकिरीट मेण उर्ध्वपातनाने काढतात, ती आसिडीफिकशन क्रिया पुढील ५ व्या भागांत लिहिली आहे. ती पहा.
 या रीतीने श्रुद्ध केलेले ओझेकिरीट मेण जरी स्वच्छ केलेल्या मधमाशांच्या मेणासारखे दिसते तरी ते मेणबत्त्या करण्यास फारसे उपयागा पडत नाही. कारण त्याच्या केलेल्या मेणबत्त्या जळतांना त्यापासून फारच धूर उत्पन्न होतो. म्हणून चौकस माहिती असल्यावाचून या रीतीचा उपयोग करूं नये.
 ३री रीत-मेस. फील्ड व सिमेन्स यांच्या पेटंट रीती-प्रमाण हे मेण शुद्ध करण्याच्या माहितीचे दिग्दर्शन खाली केले आहे.
 * लोखंडाच्या नळ्या विस्तवांत ठेवाव्या. गरमीने तापून त्या लाल झाल्यानतर त्यातून आणलेल्या वाफेस अती उष्ण वाफ असें पारिभाषीक रीतीने ह्मणतात.