पान:मेणबत्त्या.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०१


जास्त बाकदार ( वांकडी ) होते. परंतु स्टिअरीक आसीड मिश्र करून केलेल्या प्याराफीनच्या मेणबत्तीत तसा प्रकार कमी होतो.
 रसायनरीतीनें प्याराफीन वर्गातले पदार्थ हे खरे हायड्रो कार्बान होत. ज्या वर्गातील शेवटचा पदार्थ मार्शम्यास आहे, त्याच वर्गातील वरच्या प्रतीचा पदार्थ हे घट्ट प्याराफीन होय.
  सन १८९५ साली इंग्लंड देशांत तयार केलेल्या व बाहेरून आलेल्या प्याराफीनचे प्रमाण ५०००० टन होते. ब्रह्म देशांत तेनासरीम प्रांतांत खनिज तेलाच्या खाणी आहेत व त्या तेलांतून प्याराफीन निघते. रंगूनच्या खनिज तेलांत शेकडा १ भाग घट्ट प्याराफीन सांपडतें. पिट व लिग्नाईट जातीच्या आणि मातीसारख्या दगडी कोळशापासूनही प्याराफीन काढता येते. आसामप्रांती लिगनाईट जातीचा व हिंदुस्थानांत इतर खाणींत पिट जातीचा व माती सारखा दगडी कोळसा सांपडतो. तेव्हां त्या सर्वांपासून प्याराफीन काढता येईल. पण व्यापारी रीतीने कारखाना काढण्यास प्रथम तपास करून त्याचे प्रमाण काढले पाहिजे, म्हणजे कारखानदारास अधिक सोईवार पडेल.
 १७ ओझोकिरीट― हे मेण खनिज उत्त्पत्तीचे आहे. पण मूळ जे मेण बाजारांत मिळतें तें अश्रुद्ध असल्यामुळे त्यास शुद्ध व स्वच्छ केल्यानंतर त्याच्या मेणबत्त्या करतात. हे मेण तीन चार रीतीनं शुद्ध करतात. त्या रीती―
 १ लीरीत--नेपथा*( शेल स्पिरिट ) पदार्थात प्रथम हे मेण द्रवीभूत करावे. नंतर तें मिश्रण कोळशांतून गाळून काढावें. पान ७८
 * पान ७९ वर नेपथा शब्द पहा.