पान:मेणबत्त्या.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१००


 याप्रमाणे ते स्वच्छ केलेले प्याराफीन कोळशांतून किंवा 'फुलर्स अर्थ' नांवाच्या मातीतून व नंतर फडक्यांतून गाळून घेतल्यावर साचांत टाकतात. त्याचे मोठाले गढे पाडून कोठारांत मेणबत्या करण्यास्तव सांठवून ठेवतात. गाळांतून निघाललेल्या प्याराफीनचे पातळ होण्याचे उष्णमान पाहून त्याप्रमाणे त्याचा उपयोग करावा. साधारणपणे ११०° फा. अंश किंवा त्याहून जास्त उष्णमानावर पातळ होणाऱ्या प्याराफीनचा उपयोग मेणबत्या करण्याच्या कामी करतात.
 याप्रमाणे प्याराफीन मेण १ स्पिरीट डिस्टिलेशन प्रोसेसनें व २ स्वोटंग प्रोसेसने स्वच्छ केल्यानंतर त्याच्या मेणबत्या कराव्यात.
  मोठ्या प्रमाणावर काम करतांना या कामी जे हौद वापरतात त्याजवर नंबर घालावे. त्या दरेक हौदाच्या एक इंच खोलीच्या जागेत किती वजनाचें प्याराफीन मेण रहातें तें एक वेळ नक्की करून त्या हौदावर ते प्रमाण लिहून ठेवावे. म्हणजे त्या हौदांतील प्याराफीनचें वजन समजण्याची सोय होते. प्याराफीन मधील पाणी काढून टाकल्यावर त्या हौदांतील प्याराफीनचे वजन किती आहे, हे त्यांत लोखंडी किंवा लाकडी काठी बुडवून ती वर काढून तिजवरील मेणाच्या खुणेच्या इंचांप्रमाणे सहज समजू शकतें.
  ह्या स्थितीत एक घन फूट प्याराफीनचे वजन ४७ कच्चे शेर किंवा ४८ घन फूट प्याराफीनचे वजन सरासरी १ टन होते.
 एकट्या प्याराफीनच्याच कधी कधी मेणबत्त्या करतात. परंतु बहुत करून त्यांत दरशेकडा ५-१० भाग कठिण स्टिअरीक आसीड मिळवून त्या मिश्रणाच्या मेणबत्त्या करतात.
 स्वच्छ केलेल्या पण नुसत्या प्याराफीनची मेणबत्ती जळतांना जोराची उष्णता व जास्त प्रकाश पडतो, आणि ती जळतांना तिची वात