पान:मेणबत्त्या.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९९


  दुसरी निया केल्यानंतर पातळ केलेल्या प्याराफीनमध्ये थोडे पाणी असते. ते पाणी काढून टाकल्यानंतर फक्त प्याराफीन एका लोखंडी बंद हौदांत टाकावे. तेथे ते ३५०० फा. अंश उष्णमानावर गरम करावे. नंतर शिशाची कल्हई केलेल्या एका कढईत ते टाकावे. पुढे त्यांत १.८४५ विशिष्ट गुरुत्वाचे सलफ्युरीक आसीड थोडेसें ( त्यांतअसणाऱ्या हलक्या तेलकट द्रव्यांच्या मानानें ) मिळवावे. नंतर त्या कढईत हवा आणणारी एक नळी जोडावी. त्या नळीतून हवा सोडली ह्मणजे ते सर्व मिश्रण ढवळले जाते. असें ढवळण्याची क्रिया एक तास पर्यंत सुरू ठेवावी. नंतर हवा बंद करून ते प्याराफीन दोन तास किंवा अधिक वेळ स्थिर ठेवावें.
 एका हौदांत कास्टिक सोड्याचा हलक्या प्रमाणाचा द्रव (सुमारे १-५ बाय हायड़ामिटर अंशाची) भरून त्या द्रवांत तें मिश्रण मिळवून पाव तास उकळावे. नंतर ते मिश्रण कमीत कमी दोन तास स्थिर ठेऊन पश्चात् प्राणिज कोळशांतून गाळून काढावें. प्राणिज कोळशांतून प्याराफीन गाळण्याची माहिती पान७८ वर दिली आहे ती पहा.
 कोणी प्राणिज कोळशाऐवजी 'फुलर्स अर्थ' नांवाची माती त्यांत मिळवूनही ते शुद्ध करतात. १०० भाग प्याराफीन मध्ये १२ भाग फुलर्स अर्थ' मिळवून ते मिश्रण २३०° फा. अंशावर गरम करतात. नंतर जोराने ढवळून स्थिर ठेवून वरचे प्याराफीन काढून - फडक्यांतून गाळतात. कोणताही पदार्थ मिळवून प्याराफीन गाळून घेतल्यावर खाली जो गाळ रहातो त्यांतही ते मेण बरेंच शिलक असते. ह्मणून कोणी त्या गाळांत नेपथा (शेलस्पिरीट) मिळवून ते मिश्रण जोराने ढवळून स्थिर ठेवतात. ते स्थिर झाल्यावर ह्मणजे त्यांतील मळ तळी बसल्यावर, त्यावरचे द्रव्य काढून घेतात. नंतर त्यांतील नेपथा पदार्थ उर्ध्वपातनाने निराळा काढून प्याराफीन निराळे काढतात.