पान:मेणबत्त्या.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९७


 ११ हा नं. १० चा पातळ पदार्थ व नं. ६ चा घट्ट पदार्थ गरम करण्यास ठेवला आहे. पाहिजे तर एकवार गरम करून निघालेल्या प्याराफीन मेणांत हा मिळवून पुनः वड्या पाडून गरम करावा.
 १२ हा नंबर ११ चा पदार्थ पुनः गरम न करता तसाच प्राणिज कोळशांतून गाळण्यास ठेवतात, तो होय. याचे पातळ होण्याचे उष्णमान नं. ४ व नं. ९ च्या प्याराफीन पेक्षा कमी असतें.
 १३ हा पदार्थ नं. ६ व ११ मधील पातळ झालेली तेले आहेत.
  १४ ती तेलें हायड्रालीक प्रेसमध्ये दाबून काढली आहेत.
 १५ ती तेले दाबल्यावर जो घट्ट पदार्थ निघतो तो होय. हे प्याराफीन मेण हलक्या प्रतीचे असते. याचा उपयोग गंधकाऐवजी आगकाड्यांस गुलावरच्या जागी लावण्याच्या कामी करतात.
 १६ हा नं. १४ ची तेले दाबून जो अगदी पातळ पदार्थ निघतो तो होय. याचा उपयोग दिव्यांत जाळण्याच्या कामी किंवा अन्यत-हेने करतात.
 याप्रमाणे पहिल्या गाळणीत नं. ४ चें, दुसऱ्या गाळणींत नं. ९ चें, तिसऱ्या गाळणीत नं. १२ चे व चवथ्या गाळणीत नं. १६ चें प्याराफीन व नं. १६ चे तेल बाकी रहाते. त्या दरेक उत्तरोत्तर गाळणीतील प्याराफीनचे पातळ होण्याचे उष्णमान कमी कमी असते. जर स्वच्छ केलेले प्याराफीन १२०° फा० अंश उष्णतेवर .... होणारे असे तयार करणे असेल तर त्याच्या वड्यावर दुसरी क्रिया करण्यापूर्वी ते ११०° फा. अशावर पातळ होणारे करून घ्यावे लागते; व ते प्याराफीन १२५° फा. अंशावर पातळ होणारे असें तयार करणे असेल तर, वड्या पाडण्यापूर्वी ते ११५० फा. अंशावर पातळ होणारे असे असले पाहिजे. तसे नसेल तर त्यापूर्वी गाळलेल्या मेणाचा की