पान:मेणबत्त्या.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९६
वरील वर्णनाची फोड आकडेवार.


 १ या प्रथम क्रियेने घट्ट केलेल्या प्याराफीनच्या वड्या आहेत.
 २ त्या गरम करण्यास सुरुवात केली आहे.
 ३ मध्यम उष्णता दिल्यानंतर तयार झालेले मेण जास्त गरम केले आहे.

 ४ हे पुरी उष्णता दिल्यानंतर खाली राहिलेलें घट्ट व पांढरें मेण होय. यास प्राणिज कोळशांतून गाळतात. दुसरी क्रिया केल्यानंतर एवढा पदार्थ तयार होतो.
 ५ हा, पहिल्याने गरमी लावून जो पातळ पदार्थ निघाला तो होय. यास पुनः थंड करून पहिल्या क्रियेप्रमाणे वड्या पाडतात व पुनः गरम करतात.
 ६ पाचव्या नंबरच्या पदार्थास गरम करतात तो पदार्थ.
 ७ दोनदां गरम केलेल्या प्याराफीनमधून निघालेला पातळ पदार्थ याच्या पहिल्या क्रियेनें वड्या पाडतात.
 ८ नं. ७ च्या वड्या पुनः गरम करतात.
 ९ हे नं ८ चे द्रव्य गरम करून नंतर खाली राहिलेलें पांढरें व घट्ट प्याराफीन मेण आहे. हे द्रव्य दुसऱ्या वेळेस दुसऱ्या क्रियेनें प्रथम निघतें तें होय.
 १० हा नं. ८ च्या वड्या गरम केल्यानंतर निघालेला पातळ पदार्थ होय. नं. ६ चा पदार्थ पुनः गरम केल्यानंतर बाकी जो घट्ट व पांढरा पदार्थ रहातो त्यांत नंबर १० चा पातळ पदार्थ मिळवून पहिल्या क्रियेप्रमाणे वड्या पाडून गरम करतात.