पान:मेणबत्त्या.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९३



 ती जागा रिकामी केल्यावर त्या साचांतील पांढरें व घट्ट प्याराफीन वाफेनें गरम करून पातळ झाल्यावर गाळण्याची (तिसरी) क्रिया करण्यास नियमित हौदांत सोडतात. याप्रमाणे मि. हंडरसनच्या यंत्राची योजना आहे.
 या यंत्रानें काम करण्यांत मनुष्याचा श्रम वेळ व जागा फारच कमी लागतात. पण या यंत्राचे सामान बनविण्यांत पैसा फार लागतो. पहिल्या दोन क्रियांत सांगितलेल्या साधनांनी काम करणे असेल तर जागा थोडी जास्त व श्रम आणि वेळही पण थोडी जास्त लागतात. परंतु तें यंत्रसाहित्य (बैठकी साचे वगैरे) तयार करण्याची किंमत मि. हंडरसनच्या यंत्रापेक्षा कमी लागते. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून पाहिजे त्या तिीच्या यंत्रसामग्रीचा उपयोग करावा. ज्या यंत्रसामुग्रीचा उपयोग करणे असेल त्या मानाने दोन्ही क्रियेंत जो थोडासा फेरफार करावा लागतो त्याची माहिती वर दिली आहे.
  याप्रमाणे घट्ट केलेलें प्याराफीन गरम करून स्वच्छ करण्याची जी दुसरी क्रिया तिच्या साधनांची माहिती आहे.
 दुसऱ्या क्रियेनें काम करण्याच्या रीतीची माहिती–प्रथम त्या लोखंडी फळ्यांवर नारळाच्या चटईचे तुकडे पसरून त्यावर प्याराफीनच्या वड्या ठेवाव्या. नंतर कपाटाचे दरवाजे बंद करावे. काम पुष्कळ होण्यास्तव कोणी कपाटाचे ऐवजी मोठ्या खोलीतच फळ्या वगैरे सामानाची योजना करतो. तसे असेल तर खोलीचे दरवाजे बंद करावे. मि. हंडरसनच्या यंत्रानें काम करणे असेल तर सांचा खालचे पाणी काढून टाकावे व खोलीचे दरवाजे बंद करावे. नंतर वाफेच्या नळ्यांचे काक सोडून वाफेने उष्णता देण्यास सुरवात करावी. मि. एपलबीच्या