पान:मेणबत्त्या.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४



कपाटांत २१२ फा. अंशापेक्षा कमी उष्णता देत नाहीत. पण प्याराफीन या पेक्षाही कमी उष्ण मानावर पातळ होऊ शकते.
 वड्यांस जसजशी उष्णता लागत जाते तसतशा त्या नरम होत जातात. उष्णतेने प्रथम त्या वड्यांचे किनारे पांढरें दिसू लागतात. नंतर त्यांचा पृष्ठभाग पांढरा दिसतो. नंतर त्या वड्या स्पंजसारख्या होतात नंतर त्यांपैकी एखाद्या वडीतून लहान तुकडा मोडून पाहिला असता त्या वडींतून पिवळट रंगाचें तेलकट द्रव्य खाली वहात जात आहे असे दिसेल. याप्रमाणे त्या वडीचा दोन पंचमांश भाग वितळून कमी होईपयेत उष्णता द्यावी. ह्मणजे खाली असलेले प्याराफीन सर्व बाजूने पांढरें व घट्ट असें राहते. ही स्थिति प्राप्त झाली ह्मणजे उष्णता देणे बंद करावें. पातळ पदार्थ त्या वड्यांतून वाहून निघत नाहीसा झाला ह्मणजे त्या वड्या हाताने तागाच्या फडक्यासह काढून दुसऱ्या हौदांत नुसत्या वड्या टाकाव्या. मि हंडरसनच्या यंत्रांने काम केले तर त्या साचांतच असू द्याव्या. खालचे पातळ द्रव्य जेथच्या तेथे पोचविल्या नंतर तें प्याराफीन गरम करून दुसऱ्या हौदांत सोडावें. या क्रियेस २४-३० तास लागतात.
 याकामी काम करण्याची साधनें जशी निरनिराळी वापरावी, त्या त्या प्रमाणे त्या काम करण्याच्या रीतींतही थोडा थोडा फेरफार करावा लागतो.
 या क्रियेने निघणान्या द्रव्याचे वर्णन मि. टरवेट यांणी केले आहे त्याची यादी खाली वृक्षरूपांत जोडली आहे. तिजवरून कोणती द्रव्ये कशी निघतात व त्यांचे काय करतात ती रीत ध्यानात येईल.
पान ९५ पहा.