पान:मेणबत्त्या.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९२



त्या सांचाचे खाली ताराचे ते घट्ट पडदे बरोबर लागू होतात. नंतर पाण्याच्या तोटीचा काक उघडून सर्व सांचाच्या तारांच्या पडद्याखाली पाणी सोडतात. नंतर गरमीने पातळ केलेले प्याराफीन त्या साचांत वड्या पाडण्यास्तव (पहिली क्रिया करण्यास ) सोडतात. उन्हाळ्याचे दिवस असले तर त्या खोलीचे दरवाजे उघडे ठेवावे. व हिवाळ्याचे दिवस असले तर ते बंद ठेवावे. याप्रमाणे वड्या पाडण्याचे झणजे प्याराफीन घट्ट करण्याचे काम सुरू होते. साधारणपणे तें प्याराफीन त्या साचांत थंड व घट्ट होण्यास २४ तास लागतात. ते घट्ट झाले ह्मणजे पहिली क्रिया पुरी झाली असे समजावे. नंतर पाण्याच्या नळीचा दुसरा काक उघडून ते पाणी दुसऱ्या हौदांत काढून टाकतात. नंतर लोखंडाच्या कांबीस धक्का मारून त्या साचांच्या दोन्ही रांगा एकमेकासमोर उतरत्या लेव्हलवर बसवितात. त्या साचांच्या खालचे पाणी निघून गेलें झणजे जी जागा रिकामी पडते तेथें तें प्यारीफीन गरम केल्यानंतर त्यांतून निघणारी पातळ द्रव्ये निघून पडण्यास जागा हाते.
 या योगाने त्या वड्या त्या साचांतून काढून पुनः कपाटांत लाख. डी फळ्यावर ठेवण्याचे श्रम, वेळ, व खर्च फारच कमी होतो. पण तें यंत्र बनविण्याची किंमत फार असते. नंतर उष्णता देण्याचे काम (दुसरी क्रिया ) सुरू करतात. या खोलीचे दरवाजे बंद करून नळ्यात वाफ सोडावी. यावेळेस त्या वड्या तारांच्या पडद्यावर टेकलेल्या असतात. व त्यांतील गरमीने पातळ झालेले द्रव्य पडद्या खालच्या मोकळ्या जागेत येते; व तेथून ते दुसरीकडे ठेवलेल्या व खुणा केले. ल्या हौदांत सोडतात. या क्रियेस २४-३० तास लागतात. याप्रमाण अधिक उष्णमानावर पातळ होणारे प्याराफीन बाकी राहिले ह्मणज उष्णता बंद करतात. नंतर खाली गळालेले द्रव्य जेथल्या तेथे सोडून