पान:मेणबत्त्या.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९१



डणे व बंद करणे या कामावर एकच मनुष्य देखरेख करूं शकतो. हैं यंत्र बनवून त्याचे त्यांनी सन १८८७ मध्ये पेटंटही घेतले आहे.
 त्या यंत्राची सामान्य माहिती खाली लिहिल्याप्रमाणे आहे.
  मि. हंडरसनच्या यंत्राची माहिती.
  त्यांची काम करण्याची खोली ५२ फूट लांब १३। फूट रुंद व १३॥ फूट उंच असते. तीस दोन मोठे दरवाजे असतात. प्याराफीन गरम करण्यास वाफ सोडण्याच्या नळ्या त्या खोलीच्या बाजूच्या भिंतीवर लागू केलेल्या असतात. त्या खोलीत लोखंडी बैठकांच्या दोन ओळी समोरासमोर मांडतात. त्या दरेक बैठकीवर नऊ नऊ लोखंडी साचे ठेवतात त्या दरेक साचास सभोवार ४ बाजू असून तळची व वरची बाजू नसते. तळच्या बाजूस लोखंडी व घट्ट विणलेल्या तारांचा पडदा लागू केला असतो. त्या पडद्या खाली पाणी रहाण्याची सोय केली असते. त्या खाली पाहिजे तेव्हां पाणी एकदम सोडतां यावें व एकदम काढून टाकता यावे अशा सोयीसाठी नळ्या काक व त्या सर्व बंद करणे किंवा उघडणे यांचे साधन केले असते. त्याबरोबरच त्या दोन्हीं साचांच्या रांगा पाहिजे तेव्हां सारख्या उंचीवर व पाहिजे तेव्हां एकमेकाकडे उतरत्या रहातील अशी व्यवस्था मोठमोठ्या लोखंडी कांबी व त्या मागेपुढे सरकण्यास चाके वगैरे, लावून सोय केलेली असते. त्यामुळे त्या कांबीस एक धक्का दिला की साचोच्या दोन्ही रांगा सारख्या होतात व दुसरा धक्का मारला की त्या दोन रांगा समोरासमोर उतरत्या राहतात.
 या यंत्रानें काम करण्याच्या रीतीची माहिती― एक लोखं. डी कांबीस धक्का मारल्याबरोबर त्याजवरील साचाच्या दोन्ही रांगा एक सारख्या उंचीवर बसतात. नंतर दुसन्या कांबीस धक्का मारला ह्मणजे