पान:मेणबत्त्या.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९०


घड्यांस पाहिजे तितकी उष्णता दिल्यावर त्यांतील कमी उष्ण मानावर पातळ होणारी द्रव्ये जी बाहेर पडावयाची ती बाहेर पडल्यानंतर उष्णता बंद करतात. नंतर थोड्या वेळाने पांढया व कठिण अशा राहिलेल्या प्याराफीनच्या वड्या हाताने काढून लहानशा लोखंडी गाडीत ठेवतात. व त्या गाडीतून एका हौदांत टाकतात. हा हौद लोखंडी पत्र्यांचा केलेला असून जमिनीत पुरलेला असतो. त्यासही भोके पाडलेली वाफेची एक नळी व पातळ द्रव्य नेणारी दुसरी नळी अशा दोन नळ्या लागू केलेल्या असतात. याच हौदांत ते प्यारीफीन, गाळण्यास नेण्यापूर्वी गरम करून पातळ करतात, यावेळेस त्यांत थोडे पाणी असते. ते मात्र युक्तीने बाहेर काढावे लागते. यास्तव या हौदाच्या आंतील आंगास व आकर्षक पंपास पाहिजे तेथे चिकटणारी एक शोषक नळी लावून तिने ते पाणी काढून टाकतात. नंतर प्याराफीन पुनः गाळण्याची ३ री क्रिया त्यावर करतात.
 याप्रमाणे प्याराफीनच्या वड्या गरम करून त्यांतील कमी उष्णमाना. वर पातळ होणारी द्रव्ये काढून टाकून प्याराफीन शुद्ध करण्यास लागणान्या साधनांची माहिती आहे.
 मि. एपलबी साहेबांनी अशा प्रकारच्या फळ्या, कपाट, वाफेच्या नळ्या वगैरेचे साधनयुक्त यंत्र बनवून त्याचे पेटंट सन १८८६ मा घेतले होते. याप्रमाणे प्याराफीनवर दोन क्रिया करण्यास निरनिराळ्या जागा, निरनिराळी हत्यारे बैठकी वगैरे सामान फार लागते व मनुष्याच श्रम फारच जास्त होतात म्हणून मि. हंडरसनसाहेबांनी नवीन युक्ती काढून एक यंत्र बनविले आहे. त्यायोगें दोन्ही क्रिया करण्यास एकच खाली पुरते; व त्या क्रिया करतांना, स्तू फिरविणे, नळ्यांचे काक उघ―