पान:मेणबत्त्या.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८९


 ३ उष्णतेने त्या प्याराफीनच्या वड्यांतून निघणारी पातळ द्रव्ये त्या पात्रांतून निराळ्या ठिकाणी नेण्याचे साधन-त्या फळ्यांच्या दरेक रांगेमध्ये म्हणजे कपाटाच्या मधोमध त्या दोन फळ्यामधील रिकाम्या जागेत त्या दोन फळ्यांच्या खालून पन्हळा सारखा एक पत्रा मजबूत लागू करून गटर ठेवावे लागते. याच गटरांतून प्याराफीनचे वड्यांतील पातळ झालेली द्रव्ये बाहेर काढून घेतात. हे गटर कपाटाच्या रुंदीशी व त्या फांच्या रुंदीशी समांतर पण त्या फळ्यांच्या खाली व त्यावरून येणारा पदार्थ गृहण करण्यास योग्य, व तो पदार्थ त्यांतून बाहेर न जाईल असें बंद लागू केलेले असते. असें दरेक रांगेत एकेक गटर लागू केलेले असते व वरच्या रांगेतील गटराचा संबंध खालच्या रांगेतील गटरास व त्याचा त्या खालच्या रांगेतील गटरास जोडलेला असतो. याप्रमाणे दरेक रांगेत एक गटर ठेवलें असतें. व सर्वात खालच्या गटरास एक लोखंडी नळी लागू करून काकच्या योगाने तिचा संबंध ५।६ हौदांशी जोडलेला असतो. कोणी दरेक कपाटांत पुढे अथवा मागे एक उभी नळी लागू करतात व तिच्यांत त्या दरेक गटराचे तोंड सोडतात. ह्या नळीचा संबंध ५।६ हौदाशी जोडलेला असतो. त्या दरेक हौदावर खुणेसाठी नंबर लिहून ठेवतात. ह्मणजे त्यांत सांठवलेल्या द्रव्याचे पुढे काय करावयाचे ते समजते. सबब प्याराफीन गरम करून निघालेली पातळ द्रव्ये नेमक्या हौदांत सोडावी लागतात. त्याचे साधन वर लिहिल्याप्रमाणे तयार करतात.
 ४ नंतर त्या पात्रांत राहिलेलें पांडरें व घट्ट प्याराफीन पातळ करून पुनः गाळण्यास पाठविण्याचे साधन- त्या