पान:मेणबत्त्या.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८८



सारख्या लेवलवर ठेवावी. पण त्या फळ्यांच्या लांबीस गटराकडच्या बाजूस २ इंच ढाळ (उतार) द्यावा. ह्मणजे त्या दोन्ही फळ्यविराल पातळ पदार्थ त्यांच्या मधोमध लागू केलेल्या गटरांत सहज उतरू शकतो. कोणी वाफेच्या नळ्या फळ्याखाली लागू करण्यास त्या फळ्या खालून पोकळ ठेवितात. पण जेथे वाफेच्या नळ्या फळ्यांच्या पृष्ट भागावर ठेवणे असेल तेथें त्या फळ्या, खालून पोकळ ठेवण्याची जरूर नसते. याप्रमाणे वड्या ठेवण्याचे पात्र झणजे ह्या लोखंडी फळ्या तयार करतात.
 २ पात्रांत त्या वडयांस उष्णता देण्याचे साधन-खाचे ठेवलेल्या कपाटाची किंवा खोलीची दारें घट्ट बंद करण्याजोगी असावा. लोखंडी फळ्यांच्या खाली किंवा वर वाफेच्या नळ्या लागू केलेल्या असाव्यात. वाफेच्या नळ्यांस काक लागू केलेले असावे. ह्मणज पाहिजे तेव्हां त्यांत वाफ सोडण्याचे किंवा बंद करण्याचे काम करता येते वाफेच्या नळ्यांची तोंडे कोणी त्या फळ्यांच्या पृष्टभागावर उघ ठेवतात; कोणी कपाटाच्या किंवा खोलीच्या भिंतीवर उघडी ठेवतातः तात्पर्य, त्या नळ्यांतून वाफ निघून तिनें दरेक वडीचा पृष्ठभाग सब बाजूस सारखा गरम होईल अशी व्यवस्था करावी लागते. नाही तर वडीस कोठे कमी व कोठे जास्त उष्णता लागली तर काम बिघडत बायलरमधून एका मोठया नळीत वाफ आणून त्या मोठ्या नळाचा संबंध त्या कपाटांत जाणाऱ्या लहान नळ्यांशी जोडून त्यांस काक लाव लेले असतात. ते काक फिरवून वाफ सोडली म्हणजे वड्यांस गरमा लागण्यास सुरवात होते. व काक बंद केले ह्मणजे वाफ येण्याची बन होऊन गरमी कमी होत होत बंद होते. या प्रमाणे उष्णता देण्या साधन करतात.