पान:मेणबत्त्या.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८७


 या दोन्ही ह्मणजे पहिली व दुसरी क्रिया करण्यास कोणी दोन नि. रनिराळ्या खोल्यांचा उपयोग करतात किंवा कोणी एकाच खोलीत दोन्ही क्रिया करण्याचे साचे, नळ्या, कपाटे वगैरे सामान व्यवस्थित मांडून वड्या पाडण्याचे व त्या गरम करून वरच्छ करण्याचे काम करतात. ज्याच्या त्याच्या सवडीप्रमाणे व काम करण्याच्या माहितीप्रमाणे ही व्यवस्था ठेवावी.
 वरील चारही साधनांची माहिती खाली लिहिल्याप्रमाणे आहे:―
 प्याराफीनच्या वड्या गरम करण्यास ठेवण्याचे पात्र― हें पात्र ह्मणजे लोखंडी साफ फळ्या असतात. ह्या फळ्यांवर पहिल्या क्रियेनें तयार केलेल्या प्याराफीनच्या वड्या ठेवतात. घडीव लोखंडाच्या (गाल वानाइझड आयर्न) ह्या फळ्या केलेल्या असतात. दरेक फळी ८ फूट लांब व २६॥ इंच रुंद असते. ह्या फळ्या लोखंडी कपाटांत दरेक रांगेत दोन अशा बसवितात. कपाटाच्या रुंदीत ह्या फळ्यांची लांबी असते. त्या कपाटाची रुंदी १६ फूट अधिक दोन फळ्यामधील गटराची रुंदी पाव फूट मणजे १६। फूट असते. या दोन फळ्यांची एक रांग अशा कित्येक रांगा त्या लोखंडी कपाटांत लागू करतात. कपाटाची उंची पाहिजे तितकी ठेवावी. पण वड्या ठेवणाऱ्या मनुष्याचा हात, कपाटांतील सर्वात उंचीच्या रांगेस सहज पोंचेल इतक्या उंचीपेक्षां त्या कपाटाची उंची जास्त नसावी. ह्या दोन रांगेमध्ये ६-७ इंचांचे अंतर ठेवावे. त्या लोखडी कपाटास आंतून लोखंडी कांबी मारून त्या फळ्या ठेवण्यास बैठकी कराव्या. ह्मणजे कपाटास आंतून लोखंडी बैठकी असतात व त्या बैठकीवर लोखंडी फळ्या दरेक रांगेत दोन मांडतात. त्या दोन फळ्यांची रुंदी सारख्या पातळीत म्हणजे