पान:मेणबत्त्या.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८५


नळीतील प्याराफीन पातळ करण्यास सुलभता येते. त्या मुख्य नळीचा शेवट बारीक करून तेथें एक काक लागू करून तो खालच्या बाजूस उघडेल असा ठेवावा.
 काम करण्याची रीत-हौदांतील प्याराफीन घट्ट असल्यास त्यांत वाफ सोडून ते पातळ करावें. ह्मणजे ते मोठ्या नळीतून तीस जोडलेल्या अर्ध्या इंच व्यासाच्या नळींत तीन डोक्याच्या पितळी काकपर्यंत सहज येऊ शकते. तो तीन डोक्यांचा काक फिरविला ह्मणजे दोन आडव्यानळ्यांत जाऊन तेथून त्यांच्या प्रत्येक तोंडांतून चार साचांत पडते. या चार साचांपैकी प्रत्येक साचा भरला ह्मणजे त्यास ठेवलेल्या दोन खाचांतून दुसऱ्या थरांतील साचांत जाते. याप्रमाणे दरेक थरांतील ४ साचे भरले की खालच्या थरांतील साचांत तें प्याराफीन जातें. शेवटच्या थरांतील साचे भरले ह्मणजे तो काक बंद करावा. या रीतीने कामाच्या प्रमाणाने पाहिजे तितके साचे भरले झणजे तें काम बंद करावे. हे मेण घट्ट होऊन त्याजवर दुसरी क्रिया करण्यायोग्य होण्यास २४ तास लागतात. याप्रमाणे कित्येक मण मेणाच्या वड्या पाइण्याच्या कामी देखरेख करण्यास एक मनुष्य पुरा होतो.
 ही प्रथम क्रिया त्या प्याराफीनवर करण्यास, बैठकी साचे, नळ्या, काक वगैरे संबंधानें खर्च व त्रास बराच पडतो झणून दुसऱ्या साध्या रीतीने पण ही क्रिया करण्याचा शोध लागला आहे. पण हिच्यांत जागा फार लागते. ती रीत पुढे लिहिल्याप्रमाणे आहे:―
 वड्या पाडण्याची दुसरी रीत-लोखंडाचा एक लहान व एक मोठा असे दोन हौद तयार करावे. मोठा हौद सुमारे ६० फूट लांब व १० फूट रुंद असावा. मोठ्या हौदांत त्याच्या काठाखाली ३ इंच राहील इतके पाणी भरावें. लहान हौदांत पातळ प्याराफीन सोडण्यास सुरू करावें. तो लहान हौद भरला ह्मणजे त्यांत येणारे जास्त