पान:मेणबत्त्या.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८४



४८ साचे रहातात. सर्वात वरच्या थरांतील साचांचे खाचे आंतल्या आंगास तर त्याच्या खालच्या थरांतील साचांचे खाचे बाहेरच्या ह्मणजे त्याच्या समोरच्या आंगास असे खाचे असावे. यायोगें वरच्या थरांतील साचे भरल्यानंतर त्यांच्या खाच्यांतून खालच्या थरांतील साचांत व ते भरले ह्मणचे त्यांच्या खालच्या थरांतील साचांत पातळ प्याराफीन सहज जाऊं शकते. याप्रमाणे डबल बैठकी व त्यांवर साचे मांडून ठेवावे. आतां ह्या साचांत पातळ प्याराफीन सोडावयाचे आहे.
 ज्या हौदांत पातळ प्याराफीन भरून ठेवले असेल त्यास घडीव लोखंडाची व २ इंच व्यासाची एक नळी लावावी. या नळीस मुख्य नळी ह्मणतात. या मुख्य नळीस एक उभी लोखंडी अर्धा इंच व्यासाची नळी जोडावी. या लहान नळीचे शेवट बैठकीच्यावर आलेलें व तिचे उघडे द्वार खोलीच्या छताकडे केलेले अशी ती नळी त्या मुख्य नळीस लागू करावी. त्या उघड्या दारांत तीन डोक्यांचा पितळी काक बसवावा. या पितळी काकचे मधले द्वार बंद असून दुसरी दोनही द्वारे दोन बाजूकडे असावीत. या प्रत्येक द्वारांत अर्धा इंच व्यासाची आडवी नळी बसवून तिची दोन शेवटें दोन साचांवर मधोमध येतील अशी लागू करावी. ह्मणजे मुख्य नळीस एक लहान नळी व तिच्या दोनही बाजूस दोन लहान नळ्या व चार तोंडे अशी सोय झाली. या दोन तोंडांच्या प्रत्येक आडव्या नळीतून में प्याराफीन पडेल त्याने दोन साचे भरले जावे. साचांचे थर १२ आहेत ह्मणजे त्या प्रत्येक आडव्या नळीने २४ साचे भरावे. डावीकडचे २४ व उजवीकडचे २४ मिळून ४८ साचे भरण्यास मुख्य नळीच्या मुळाशी एक पडदा किंवा दाबण्याचा काक लागतो. त्या मुख्य नळीत वाफ नेण्यासाठी एक बारीक नळीही लागू केलेली असते. कारण प्याराफीन घट्ट झाले तर ह्या बारीक नळीत वाफ सोडून तिच्या गरमीने मुख्य