पान:मेणबत्त्या.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८३


ल्या खोलीच्या रुंद जागेत मांडून तिच्या लांबीपर्यंत न्याव्या. त्या बै-' टकी लोखंडी कांबीच्या व चतुष्कोण आकाराच्या केलेल्या असतातत्यांस आडव्या व उभ्या लोखंडी कांबी बसविलेल्या असतात. या बैठकीची उंची ४ फूट असून तिच्यांत साचांचे १२ थर रहातील इतके पडदे अडव्या व उभ्या कांबींचे केलेले असतात.
 साचे ―ज्यांत प्याराफीन ओतून घट्ट करावयाचे त्यास साचा म्हणतात. हे साचे लोखंडाचे करून त्यांस आंतून कल्हई केलेली असते. हा दरेक साचा २२॥ इंच लाब, २२॥ इंच रुंद, २॥ इंच खोल व चतुष्कोणी असतो. दरेक साचाचे वजन ९ शेर असून त्यांत २० शेर प्याराफीन राहूं शकतें; व त्यास सुमारे २॥ रुपये किंमत पडते. जमिनीजवळचा म्हणजे सर्वात खालचा साचांचा थर सोडून वरच्या ११ थरांतील दरेक साचास त्याच्या काठाजवळ एका बाजूस २ खाचण्या ( काप ) केलेल्या असतात. यायोगें तो साचा खाचणीपर्यंत पातळ प्याराफीनने भरला म्हणजे बाकीचें प्याराफीन त्याच्या खालच्या थरांतील साचांत जातें, व तो भरला म्हणजे त्याच्या खालच्या थरांतील साचांत जाते. याप्रमाणे १२ व्या थरांतील साचांत प्याराफीन जाऊन तो भरला म्हणजे मूळ नळी बंद करून प्याराफीन सोडण्याचे बंद करतात.
 साचांची मांडणी:-दुहेरी बैठकीच्या रुंदीत दोन साचे बसवावें. त्यांच्या खाली व डबल बैठकीच्या मधल्या १४ इंच जागेकडे किंचित पुढे आलेले असे साचे दुसन्या थरांत बसवावे. नंतर पहिल्या थरांतील साचासारखे म्हणजे किंचित मागे गेलेले असे तिसऱ्या थरांत बसवावे. म्हणजे एका थरांत डावेबाजूस पुढे आले असले तर दुसरें थरांत उजवे बाजूस पुढे असे कमी जास्ती एका थरांत पुढे व दुसऱ्यांत मागे गेलेले साचे १२ थरांत बसवावे. ते थर एकेकाखाली असावे. याप्रमाणे ४ फूट चौरस व ४ फूट उंच जागेत, ४ साचांचा एक थर असे १२ थर मगजे