पान:मेणबत्त्या.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२


त्या हौदांत स्थिर ठेवावे. नंतर त्या खालचे पाणी व मळ एका नळीने दुसऱ्या पात्रांत काढून घेतात व तें वरचें प्याराफीन थंड करण्याच्या खोलीतील साच्यांत सोडतात. या हौदास भोके पाडलेली नळी तळाशी लागू केली असते. कारण या स्थितीतही ते पातळच असावे लागते. पातळ नसल्यास त्या भोके पाडलेल्या नळीतून वाफ सोडून ते पातळ करावे लागते. असे हौद कामाच्या प्रमाणाने एक किंवा अधिक असतात व ते थंड करण्याच्या झणजे वड्या पाडण्याच्या खोलीजवळच ठेवतात. कारण या हौदांतून ते पातळ प्याराफीन त्या खोलीतील साच्यांत सोडावयाचे असते. अशा कामी जी भांडी, हौद, कढया, नळ्या वगैरे सामान लागतें तें सर्व लोखंडाचेंच केलेले असावें.
 येणेप्रमाणे प्याराफीन गरम करून त्यांतील पाणी व मळ तळीं जमवून निराळा करून या साठवणीचे हौदांत फक्त प्याराफीन ठेवलें आहे त्याच्या वड्या किंवा तुकडे पाडावयाचे आहेत. ज्या खोलीत हे वड्या पाडण्याचे काम करतात तीस थंड करण्याची खोली म्हणतात.
 ह्या खोलीच्या तळच्या जमिनीस उत्तम चुनेगच्ची केलेली असावी. कारण तिजवर पडलेले प्याराफीन शोषले जाऊंनये किंवा खराब होऊ नये. ह्या खोलीत प्याराफीन घट्ट करण्याचे सांचे ठेवण्यास लोखंडी बैठकी ठेवाव्या लागतात. दरेक बैठक १७ इंच रुंदीची असते. अशा दोन बैठका मर्यादित अंतरावर ठेवल्या तर त्या खोलीच्या रुंदीची चार फुट जागा त्यांच्या रुंदीने अडविली जाते. या दोन बैठकीच्या रुंदीमध्ये १४ इंच जागा मोकळी ठेवावी. या दोहोंस दुहेरी बैठक म्हणतात. त्यांची लांबी खोलीच्या लांबी इतकी असल्यास हरकत नाही. याप्रमाणे दरेक डबल बैठकीची रुंदी, त्या खोलीच्या रुंदीच्या ४ फूट जागेत मावते. त्या जागेपुढें काम करण्यास रस्ता ठेवून दुसरी बैठकीची ओळ लागू करावी. याप्रमाणे पाहिजे तितक्या दुहेरी बैठकी