पान:मेणबत्त्या.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८१



उष्ण मानावर पातळ होणारी हलकी द्रव्ये काढीत काढीत स्वच्छ करणे. शेवटी पांढरें स्वच्छ व घट्ट प्याराफीन तळी राहिले म्हणजे गरमी बंद करून ते सर्व एका लोखंडी हौदांत सोडणे.
 ३री क्रिया-असें तयार झालेले प्याराफीन पुनः एकवार गाळून धुवून स्वच्छ करणे.
  सारांश, अशुद्ध प्याराफीनमध्ये जे घटक कमी उष्णमानावर पातळ होण्यासारखे असतात ते कमी उष्णमानावर पातळ करून त्यांतून काढून टाकावेत; नंतर त्यापेक्षा जास्त उष्णमानावर पातळ होण्यासारखे जे घटक असतात ते पहिल्यापेक्षा जास्त उष्णमानावर पातळ करून काढून टाकावेत; याप्रमाणे पांढरें स्वच्छ व घट्ट प्याराफीन तळी राहील तोपर्यंत करून नंतर त्यास थंड करावे. हे या रीतीचे मुख्य तत्व आहे. शुद्ध स्वच्छ प्याराफीन पातळ होईल इतकें उष्णमान मात्र त्यास पोचूं देऊं नये. नाहीतर स्वच्छ व अस्वच्छ प्याराफीन पातळ होऊन एकत्र बाहेर निघेल व क्रिया फुकट जाईल.
 १ली क्रिया-वड्या पाडण्याची होय. या क्रियेस इंग्रजीत ( cooling process ) थंड करण्याची क्रिया ह्मणतात. प्रथम जें प्याराफीन स्वच्छ करणे असेल तें गरम करून वड्यांच्या आकारांत थंड करतात. ज्या कारखान्यांत जमीन उंच असेल तेथे त्या उंच जमिनीवर प्याराफीन गरम करण्याची कढई ठेवावी. तिच्यांत प्याराफीन टाकून उघडया वाफेने ते पातळ करावें. ह्मणजे त्या कढईस लावलेल्या नळीतून ते पातळ प्याराफीन, खालच्या बाजूस ठेवलेल्या स्थिर करण्याच्या हौदांत सोडण्यास सुलभ पडते, अशी सोय जेथें नसेल तेथें तें बंद कढईत टाकून वाफेने पातळ करतात. नंतर हवेच्या किंवा वाफेच्या दाबाने अथवा पंपानें तें स्थिर ठेवण्याच्या हौदांत सोडतात. त्यांतील पाणी व मळ खाली बसून फक्त प्याराफीन वर येईपावेतों तें ६