पान:मेणबत्त्या.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०


यन रीतीने नेपथा या पदार्थाचे घटक कार्बान व हैड्रोजन है 'आहेत. हा फारच ज्वालाग्राही आहे. म्हणून त्याचा उपयोग करतांना फारच सावधगिरी ठेवावी लागते. यांत बहुतेक जातीची मेणे व तेलें द्रवीभूत होतात; यास शेलस्पिरीट म्हणतात.
 २री रीत-प्याराफीन स्वच्छ करण्याच्या दुसऱ्या रीतीस स्वेटींग प्रोसेस म्हणतात. या रीतीचा शोध सन १८७१ मध्ये एका क्षुल्लक कारणावरून लागला होता. एक वेळ सहज प्याराफीनचा तुकडा एका वाफेच्या नळीवर पडला व पातळ झाला, त्यामुळे त्याच्या रंगांत जास्त पांढरेपणा आला होता. यावरून तो जास्त पांढरेपणा कशाने आला, ह्या गोष्टीचा विचारपूर्वक शोध केला. व तो शोध पूर्ण झाला, त्यामुळेच ही स्वेटींग प्रोसेस (प्याराफीन गरम करून शुद्ध करण्याची रीत) उत्पन्न झाली. यापूर्वी कित्येक रसायनज्ञ पंडितांनी, प्याराफीनमधील भिन्न घटक उर्ध्वपातनाने निरनिराळे काढले होते. या रीतीचें मि० हाजेस साहेबांनी १८७१ साली पेटंट घेतले होते. ते पेटंट १८८५ साली पुरे झाले. तेव्हांपासून प्याराफीन स्वच्छ करणारे लोक या रीतीचा उपयोग करूं लागले. हल्लीच्या वेळचे बहुतेक प्याराफीन मेण याच रीतीने स्वच्छ करून शेवटी नेपथा ( शेल स्पिरीट) पदार्थाने धुवून तयार केलेले असते. या रीतीने प्याराफीन मेण स्वच्छ करण्यास त्यावर निरनिराळ्या तीन क्रिया कराव्या लागतात. त्या क्रिया―
 १ ली क्रिया-प्याराफीन गरम करून त्यांतील पाणी व मळ निराळी केल्यानंतर त्याचे एकसारख्या आकाराचे तुकडे किंवा वड्या पाडणे.
 २री क्रिया-पहिल्या क्रियेने तयार झालेले तुकडे किंवा वड्या लोखंडी फळ्यांवर बंद कपाटांत किंवा खोलीत ठेवून त्यांस प्रथम ८५ फा. अंश उष्ण मानापासून गरम करीत करीत व त्यांतील हलक्या