पान:मेणबत्त्या.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७९


वाफेच्या रूपाने त्यांतील पाण्याचा भाग उडून जातो. याप्रमाणे त्यांतील सर्व पाणी उडून गेल्यावर त्यांत प्याराफीनच्या दर १०० भागास ताज्या जाळलेल्या प्राणिज कोळशाची भुकटी २॥ पासून ५ भाग याप्रमाणानें मिळवावी. नंतर ते मिश्रण अर्ध तासपयंत जोराने ढवळावे. नंतर तें स्थिर ठेवावे म्हणजे कोळशाची भुकटी तळी बसते व पातळ प्याराफीन वर येते. ते फडक्यांतून गाळून काढावे म्हणजे त्या पातळ प्याराफीन मधील कित्येक न ठरलेले व बारीक असे कोळशाचे कण त्या फडक्यावर राहतात व पातळ प्याराफीन खालीं गळून येते. या वेळेस तें पातळ प्याराफीन पाण्यासारखें स्वच्छ असतें तें साचांत टाकून थंड होऊ द्यावे. थंड होऊन ठरल्यावर साचांतील गठे काढून कोठारांत साठवावें. त्याच्या मेणबत्त्या करतात.
 दुसऱ्या रीतीने म्हणजे स्वेटींग प्रोसेसनें स्वच्छ केलेल्या प्याराफीनपेक्षा, ह्या पहिल्या म्हणजे स्पिरीट डिस्टिलेशनच्या रीतीने स्वच्छ केलेलें प्याराफीन फारच चांगले असते. म्हणून नेपथा स्पिरीट मिळवून दाबून प्याराफीन स्वच्छ करण्याची रीत अप्रतिम आहे. आणि म्हणूनच बाजारांतही याच रीतीने स्वच्छ केलेल्या प्याराफीन मेणास दुसऱ्या रीतीने स्वच्छ केलेल्या प्याराफीन मेणापेक्षा जास्त किंमत येते.
 नेपथा-हा पदार्थ मद्यार्क (spirit) सारखा हलका असून प्रवाही आहे; स्पर्शास तेलकट व पिवळट पारदर्शक रंगाचा असन त्यास उग्र, तिखट व खराब वास येत असतो. हा स्वतः सिद्ध अमेरिका व एशीआ खंडांत सांपडतो. पण व्यापारी चिजा तयार करण्याच्या कामासाठी, बायटूमेन, खनिज तेल (पेट्रोलियम ), बारबाडोज टार, कोळशाचा डामर ( दिव्याचा ग्यास काढतांना तयार होतो तो) व लांकडे इतक्या पदार्थापासून हा पदार्थ उर्वपातनाने काढतात. रसा