पान:मेणबत्त्या.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८



पातनाने ती नेपथावाली तेले निराळी करावी. वाफेच्या गरीने ऊर्ध्वपातन करून नेपथा निराळा करून तो प्याराफीन धुण्याच्या कामी पुनः वापरावा; व बाकी राहिलेली तेलें आसीड व अलकलीच्या योगाने इतर तेलाप्रमाणे शुद्ध करावी. वरचेवर नेपथा स्पिरीटमध्ये प्याराफान धुवून नंतर हा. प्रेसमध्ये दाबून जरी त्यांतील रंग व पातळ तलकट द्रव्ये नाहीशी होतात तरी त्यांत थोडासा नेपथा स्पिरीट कायम असताच; तो काढून टाकावा लागतो.
 यास्तव तें प्याराफीन एका लोखंडी नळिका यंत्रांत घालावें व उष्णतेने पातळ करावे. त्या पातळ प्याराफीनमध्ये भोके पाडलेल्या दुसऱ्या नळीतून फार गरम केलेली वाफ सोडावी म्हणजे ते पातळ प्याराफीन जोराने ढवळले जातें व उष्णतेच्या योगाने त्यांतील नेपथा स्पिरीट त्या यंत्रास लागू असलेल्या नळी वाटे बाहेर पडतो. तो धरून थंड करून ठेवावा त्या प्याराफीनला आतां नेपथा स्पिरीटचा जरापण वास येत नाही अस झाले म्हणजे त्यांत गरम वाफ सोडणे बंद करावें. ह्या कृतीस त्यामूळ तेलाच्या किंवा स्पिरीटच्या विशिष्टगुरुत्वाप्रमाणे व प्याराफीनमध्ये सोडलेल्या वाफेच्या कमीजास्त गरमीच्या प्रमाणाप्रमाणाने ६ पासून १८ तास लागतात.
 नंतर ते पातळ प्यारानिमेण, प्राणिज कोळशांमधून गाळावे लागते. ही गाळण्याची कृती बरोबर घडण्याकरितां त्या प्याराफीनमध्ये त्यावेळेस असणारे सर्व पाणी प्रथम काढावे लागते नंतर कोळशाचा क्रिया त्याजवर करावी लागते. यास्तव ते पातळ प्याराफीन त्या नाळका यंत्रांतून काढून बाष्पवेष्टित (Steam jacketed pan) कढईत टाका साबू पुस्तकांत आकृती नं. २९ मध्ये बाष्पवेष्टित कढईचे चित्र आहे. या त (jacket) वाफ सोडून ते मेण गरम करावें म्हणजे