पान:मेणबत्त्या.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७७


 या रीतीनें प्याराफीन शुद्ध करण्यांत आणखी एक महत्वाची बाबद लक्षात ठेवावी लागते ती ही की, प्याराफीन ऊन करून पातळ केल्यानंतर किती उष्णमानावर थंड करावे?' ऊन केलेलें प्याराफीन थंड होतांना स्फटिकीभवन होते. थंड होण्याची क्रिया जसजशी हळूहळू होत जाईल तसतसें स्फटिकीभवन (crystallization) अधिक पूर्ण (चांगले) होते. पूर्ण स्फटिकीभवन झालेले झणजे हळूहळू थंड करून ठरलेलें प्याराफीन दाबतांना स्पंजसारखें होते; व त्यायोगे त्या प्याराफीनमध्ये असणारे मूळचे अशुद्ध पदार्थ, त्यांत मिळविलेल्या स्पिरिटमध्ये मिळाले जाऊन, त्या स्पिरिटबरोबर बाहेर निघून जातात, व प्याराफीन अधिक शुद्ध होत जाते. ह्मणून ऊन केलेले प्याराफीन थंड करण्याची घाई न करितां हळूहळू थंड होऊ द्यावें.
 आतां उलटपक्षी, जलदीने थंड केलेलें प्याराफीन चकाकीत व अर्धपारदर्शक तर नसतेच पण त्यांतील मळकट भाग दाबाने लवकर बाहेर निघत नाहीत ह्मणून कणकीच्या गोळ्यासारखें नरम व पांढरवट असे दिसते.
 प्याराफीन तीन वेळा दाबून काढल्यानंतर जो नेपथा बाहेर निघतो त्यांत थोडें प्याराफीन व थोडा मळ द्रवीभूत झालेला असतोच. मागे सांगितल्याप्रमाणे या नेपथा पदार्थाचा उपयोग पुनः एक किंवा दोन वेळ प्याराफीन शुद्ध करण्याकडे करावा किंवा त्यांतील नेपथा ऊर्ध्व पातनाने काढून घेऊन प्याराफीन पुनः धुण्यास सांठवून ठेवावा व राहिलेले प्याराफीन मूळ हौदांत टाकून त्यावर प्रथमपासून शुद्ध करण्याच्या क्रिया कराव्या.
 सर्व क्रियांत प्याराफीन प्रथम धुण्यास वापरलेला नेपथा दाबून काढल्यावर त्यांत हलक्या प्रतीची तेलें पुष्कळ असतात. म्हणून उर्ध्व