पान:मेणबत्त्या.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६



असते. त्यायोगे त्या नळीत वाफ सोडली म्हणजे ती लोखंडी टोपली व प्रेसमधील भाग गरम होतात व त्यामुळे दाबून निघालेलें तेल प्रवाही स्थितीत रहाते. त्या ड लोखंडी टोपलीच्या पुढे अथवा मागें एक लोखंडी नळी लागू केलेली असते. त्या नळीवाटे त्या टोपलीतील तेल काढून घेता येते अथवा साठवणीच्या हौदांत सोडतां येतें.
 याप्रमाणे आकृती नं. २ मध्ये दाखविलेल्या हायडालिक प्रेसची मांडणी असते व वरील रीतीप्रमाणे प्याराफीन दाबून स्वच्छ करण्यास त्याचा उपयोग करतात.
 अशा प्रकारे बाजारी प्याराफीन नेपथा स्पिरिटमध्ये मिळवून काळजीपूर्वक दाबून काढले तर अशा तीन क्रियांनी ते चांगले स्वच्छ होतें. वरील रीतीने में प्याराफीन शुद्ध करतात तें यांत्रिक रीतीने शुद्ध होतें.
 याकामी प्रेस, दाब, उष्णता, मजूरी वगैरे इतर व्यवस्था बरोबर आहेत, असे गृहीत धरून चाललों तरी गणितशास्त्राच्या रीतीने हिशेब करून त्यांत नफा किंवा नुकसान आढळेल त्यावर या रीतीचा उपयोग अवलंबून असतो. ह्मणजे या रीतीने प्याराफीन शुद्ध करण्याने जर नफा होत असेल तरच या रीतीचा उपयोग करावा. हिशेब करण्याच्या बाबदी पुढे लिहिल्याप्रमाणे आहेत. १. दरेक वेळेस शेलस्पिरिट किती खचे झाला. २. दरेक दाबानंतर तेल व स्पिरिट त्या प्याराफीनमध्ये किती राहिले. ३. किती वेळां स्पिरिट त्यांत मिळविलें, ४. व किती वेळ तें प्याराफीन दाबले. ह्या सर्व मेहनतीचा खर्च व फुकट गेलेल्या स्पिरिटचा खर्च व मूळ प्याराफीन खरेदीचा असे सर्व खर्च मिळून जो खर्च येईल त्यापेक्षां या रीतीने शुद्ध केलेले प्याराफीन विकून जे उत्पन्न येईल तें अधिक असले तर हा धंदा फायदेशीर होईल असे समजावें.