पान:मेणबत्त्या.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७५


केल्यानंतर, प्रत्येक अ पत्रा जो मार्गे पडावयाचा ( सरावयाचा) तो त्या कांबीच्या वाढत्या आकारामुळे मागे न सरतां तसाच तेथें राहतो. म्हणजे अहे पत्रे तसेच त्या ठिकाणी एकमेकापासून सारख्या अंतरावर रहातात. व या योगाने त्या प्रेसमध्ये म्हणजे अ पत्र्यावर प्याराफीनच्या पिशव्या पुनः ठेवण्याचे काम फार सुलभ व कमी अडचणीचे होते.
 ह्या प्रेसचा तळ ओतीव लोखंडाचा असून टोपल्यासारखा खोल असतो. त्या लोखंडी टोपल्यांत अ पत्र्यावरील पिशव्यांतून निघालेला पातळ द्रव जमतो, सिलींडरच्या वरच्या भागावर व उभ्या खांबांच्या तळच्या भागावर गळपटयासारखें लोखंडाचे पट्टे असतात. ह्या पट्यांच्या आंत व अ पत्र्याच्या बाहेर पण दोन अ पत्र्यांच्या मधील जागेत लहान लोखंडी अर्ध्या नळ्या (पन्याळासारख्या ) बसविलेल्या असतात. त्या योगें प्याराफीन दाबून जो पातळ पदार्थ निघतो तो त्या खांबावरून किंवा ब कांबीवरून खाली न उतरतां ड या लोखंडी टोपलीत पडतो. आकृती नं. २ मध्ये दाखविलेल्या गोल खांबांच्या बाहेर ज्या दुहेरी रेघा दिसतात तेच हे पन्याळ किंवा अर्ध्या नळ्या आहेत. ह्या प्रेसवर घडीव लोखंडी पत्र्याचे वेष्टण असते. व त्यास बिजागरें लावलेला दरवाजा पुढच्या बाजूस असतो. याच दरवाजांतून प्याराफीन भरलेल्या पिशव्या त्या प्रेसमध्ये ठेवतात, व त्यांतून बाहेर काढतात.
 त्या प्रेसच्या डाव्या व वरच्या बाजूस क ही नळी लागू केलेली असते. ती लोखंडी असून तीस भोके पाडलेली असतात. या नळीत वाफ सोडली असतां दाबल्या जाणारे पदार्थाचे उष्णमान वाढविता येते. प्रेसच्या डाव्या वरच्या बाजूस पुढे आलेली तोटी दिसते तेथें तीक नळी सुरू होते व तेथून त्या प्रेसच्या खाली व पाठीमागे नेऊन नंतर तेथून त्या लोखंडी टोपलीच्या तळाच्या सभोवार दोन्ही बाजूस वेष्टिलेली