पान:मेणबत्त्या.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७३




 या तीनही क्रिया प्याराफीनवर करण्यापूर्वी तें अशुद्ध प्याराफीन, तेल स्वच्छ करण्याच्या यंत्रांत घालून साफ करून घ्यावे लागते. नाहीतर वरप्रमाणे दाबण्याच्या तीनही क्रिया केल्या तरही ते प्याराफीन चांगले स्वच्छ होत नाही. तसेच प्रत्येक दाबाची क्रिया करण्यापूर्वी त्यांत शुद्ध नेपथा ( अशुद्ध नव्हे ) मिळविला तर ते प्याराफीन अधिक स्वच्छ होते. अशुद्ध नेपथा मिळवून स्वच्छ केलेले प्याराफीन, शुद्ध नेपथा मिळवून स्वच्छ केलेल्या प्याराफीनप्रमाणे स्वच्छ व पारदर्शक होत नाही. याप्रमाणे स्पिरीट डिस्टिलेशन प्रोसेसनें प्याराफीन स्वच्छ करतात त्या कामी दाब करण्यास जो हायडालीक प्रेस वापरतात, त्याचे वर्णन—

हायड्रालीक प्रेस.

  या कामी पूर्वी जो हायड्रालीक प्रेस वापरीत असत तो उभा असे व त्यांत उष्णता देण्याचे साधन नसे, नवीन त-हेच्या ह्या प्रेसमध्ये दाबलेल्या पदार्थांस उष्णता देण्याचे साधन असते व तो आडवा ठेवूनही दाबण्याचे काम करितां येते. नव्या त-हेचे असे हायड्रालीक प्रेस वाक्सहालचे नीडह्याम व काईट आणि पारीसचे गाल आब्रन फेरीज हे तयार करतात. प्याराफीन, स्परम्यासिटी व स्टिअरीन शुद्ध करण्यास या नवीन व उष्णता देतां येणाऱ्या हायडालीक प्रेसचाच उपयोग करितात.
 पहा, हा हायडालीक प्रेस ग्लासगोच्या मेरीहिलच्या एन्जीन वर्कसच्या क्लार्कसन व बेकीट यांनी केलेला आहे व हल्ली याचाच उपयोग अशा कामी फार करूं लागले आहेत. तो उभा ठेवलेला आकृतीमध्ये दाखविला आहे. त्याचे वर्णन-आकृती नं. २ हायडालीक प्रेस.