पान:मृच्छकटिक.pdf/9

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ८ )

पडलेला होता. वसन्तसेना ज्या रस्त्याने चालली होती त्याच रस्त्यावरून शकाराची स्वारी पण येत होती. शकाराने वसन्तसेनेला पाहिले आणि तो तिच्या मागे लागला. अंधार आणि गोंधळ यांच्या गडबडीत वसन्तसेना पळतां पळतां आपल्या दासींपासून एकटी पडली. तिच्या पायांतल्या नूपुरांचा आवाज आणि वेणींतल्या फुलांचा सुगंध यांच्या अंदाजाने त्या दाट अंधारांतहि शकार तिचा पाठलाग करीत तिच्या मागोमाग येत होता. आता कोठे आसरा घ्यावा या काळजीत वसन्तसेना होती. इतक्यांत शकार बावळटपणाने ओरडला ‘अरे, ही इकडे चारुदत्ताच्या घराकडे कुठे निघाली !'

 वसन्तसेनेला थोडा धीर आला. तिने पायांतले नपुर काढले, वेणींतली फुलें फेकून दिली. आणि काय योगायोग! नेमके त्याचवेळी चारुदत्ताच्या घराचे दार उघडले. चारुदत्ताचा मित्र मैत्रेय आणि त्याची दासी रदनिका बळी टाकण्यासाठी म्हणून रस्त्यावर आलेली होती. रदनिकेच्या एका हातांत दिवा होता. वसन्तसेना चटकन पुढे झाली आणि आपल्या पदराने दिवा विझवून टाकून उघड्या दारांतून झटकन आंत शिरली.

 बाहेर आतां सर्वत्र काळोखच होता. शकाराबरोबर त्याचे मित्र विट आणि चेट हे दोघे होते. ते एकमेकांनाच पकडून अंधारांत “ सांपडली रे सांपडली' म्हणून ओरडत होते. असे चाचपडत असतांनाच शकाराच्या हातीं स्त्रीची वेणी लागली. मग काय ! तो जोरजोराने ती वेणी