पान:मृच्छकटिक.pdf/8

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ७ )

खपण्यासारखी नव्हती. त्या रसिकतेनेच त्याला दरिद्री बनवले. परंतु त्या रसिकतेनेच त्याला आणखी एक लाभ करून दिला !

 कामदेवाच्या मंदिरांतील बागेत वसंत पौणिमेला मेळा

भरला होता. वसन्तसेना गणिका खरी; पण तिला शरीर-

सौंदर्याबरोबरच कंठमाधुरीहि अप्रतिम लाभलेली होती. कामदेवाच्या उत्सवांत चारुदत्त अर्थातच हजर होता. आणि वसन्तसेना गात होती. वसन्तसेनेच्या गोड गळ्यावर चारुदत्त अगदी खुष झाला. वसन्तसेनेने या रसिकश्रेष्ठाला पाहिले तेव्हां ती नुसती प्रसन्नच झाली नाहीं तर तिचे हृदय त्याच्याविषयींच्या प्रेमपाशांतहि जखडून गेले. परंतु हे प्रेम सफळ कसे होणार? वसन्तसेना पडली जन्मानें वेश्या आणि चारुदत्त उच्च कुळांतला प्रतिष्ठित ब्राह्मण.

 वेश्या म्हणजे ती कोणाच्याहि मालकीची. त्यांतल्या त्यांत जे श्रीमंत आणि राज्यांतील अधिकार हाती असलेले त्यांचा तिच्यावर हक्क अधिक. असे असतांना वसन्तसेना या वेश्येनें चारुदत्ताला आपले हृदयसर्वस्व देऊन टाकावे हे शकाराला मुळींच रुचलें नाहीं.

 वसन्तसेना आपल्या वेश्यावृत्तीला उबगली होती. तिला कोठे तरी शुद्ध प्रेमाचा आसरा हवा होता. चारुदत्ताच्या

ठिकाणी तिला तो मिळेल असा तिचा विश्वास होता.

 वसन्तसेना एका रात्रीं नटूनथटून रस्त्याने चालली होती. बरोबर तिच्या दासी होत्या. अंधार चांगलाच