पान:मृच्छकटिक.pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १२ )

पोटाचा उद्योग मालीश करण्याचा. याच कामासाठीं तो हीं दिवस चारुदत्ताकडेहि होता. आणि चारुदत्ताकडची नोकरी सोडूनच तो या जुगारीच्या व्यसनांत फसला होता.

 संवाहक एकाकाळचा का होईना, पण चारुदत्ताचा नोकर आहे हे समजतांच वसन्तसेनेला त्याच्याबद्दल विशेष सहानुभूति वाटली. त्याच्या तोंडून चारुदत्ताची स्तुति ऐकून तर तिला इतकें बरे वाटलें कीं, तिने आपल्या हातांतली सोन्याची बांगडी काढून देऊन जुगारी संवाह- काचे देणे पुरे करून टाकले. वसन्तसेनेच्या अंत:करणाचा तो थोरपणा पाहून संवाहक शरमला आणि त्याने तत्काळ बौद्धभिक्षुची दीक्षा घेतली.

 संवाहक निघून गेल्यानंतर कांहीं वेळांतच वसन्तसेनेचा नोकर कर्णपूरक तिच्याकडे धांवत आला. त्याने नुकत्याच केलेल्या पराक्रमाचे समाधान त्याच्या चेह-यावर दिसत होते. “ बाईसाहेब, चारुदत्त खरोखरीच उदार ! हे पाहा त्याने माझ्या धाडसाबद्दल मला दिलेले बक्षीस! " हातां- तली सुळसुळीत सुगंधी शाल वसन्तसेनेपुढे करीत कर्ण पूरक म्हणाला. त्याने खरोखरीच मोठे विलक्षण धाडस केलेले होते.

 संवाहक पश्चात्ताप पावून भिक्षु बनला, तो रस्त्याने चालला होता. इतक्यांत वसन्तसेनेचा एक पिसाळलेला हत्ती समोरून येत होता. त्याने त्याला सोडेंत धरून वर उचलले. त्या बिचाऱ्या भिक्षुला तेथेच निर्वाण मिळण्याची पाळी आली ! कोणी त्या हत्तीला आवरण्यासाठी पुढे