पान:मृच्छकटिक.pdf/12

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ११ )

मैत्रेयाने त्याच्या दारासमोर घडलेला प्रसंग चारुदत्ताला अगोदरच सांगितलेला होता.त्यावरून वसन्तसेना आपल्या- वर प्रेम करीत असल्याचे चारुदत्ताला समजून आलेंच होते. आता तिच्या या शालीन वागणुकीने तर ती चारु- दत्ताला अधिकच प्रिय वाटू लागली. परंतु याचा अर्थ चारुदत्ताने तिच्या प्रीतीचा स्वीकार केला असा मात्र नव्हता.

 वसन्तसेनेने आपल्या घरी परत जावयास निघण्यापूर्वी आणखी एक गोष्ट केली. ती म्हणाली, “सध्यां चोरा- चिलटांची फार भीति आहे. तेव्हां एवढे माझे दागिने आपल्याकडे राहू द्यात. चारुदत्ताने पुष्कळ आढेवेढे घेऊन मग त्या गोष्टीला संमति दिली. इतकेच नव्हे तर तो तिला तिच्या घरापर्यंत स्वतः पोहोंचवायलाहि गेला.

**

 दुसरे दिवशीं वसन्तसेना आपल्या महालांत बसली असतांना संवाहक नांवाचा एक माणूस धापा टाकीत तिच्याकडे येऊन पोहोचला. हा होता एक अट्टल जुगारी. जुगार खेळता खेळतां हे राजेश्री दहा मोहरा हरले होते. आणि त्या देण्यासाठी जवळ कांहींच नसल्यामुळे शेवटी त्याने उदार वसन्तसेनेकडे धाव घेतली होती.

 त्याने थोडक्यांत आपली कर्मकहाणी सांगितली. संवा- हक हा मूळ एका मोठ्या कुलीन घराण्यांतला. परंतु पुढे कुसंगतीने जुगारी बनला आणि भणंग झाला. त्याचा