Jump to content

पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महायुद्धांत सांठाही पाठवून दिला नाही. राशयन सैन्य तर सावकाश आक्रमण करीत होते. १७ सालच्या उन्हाळ्यांत रशियन सैन्य आपल्यावर हल्ला करील असा त्यांनी अंदाज बांधला. तेवढ्या वेळांत सैन्यामध्ये शक्य तितकी सुधारणा करण्याचा त्यांनी बेत केला. मक्तेदारांकडून औषधाची व अन्नाची कशीबशी तरतूद करविली; पण दारुगोळ्यांचा पुरवठा नसल्यामुळे उन्हाळ्यांत राशयन सैन्याने हल्ला केल्यास त्याचा प्रातकार करणे अगदी अशक्य आहे अशी त्यांची खात्री झाली. आतापर्यंत आपण अनेक विजय मिळविले; पण या वेळेला मात्र पराभव खावा लागणार या विचारानें कमालपाशांना फार वाईट वाटले; तथापि धीर न सोडतां आहे त्यांतच परिस्थितीत त्यांनी निकराने लढण्याचे ठरविले. शेवटीं परमेश्वर त्यांच्या सहाय्यास धावून आला. रशियामध्ये क्रांति होण्याची स्पष्ट चिन्हें दिसू लागली, क्रांतीच्या वार्तेमुळे रशियन सैन्यावर बराच परिणाम झाला. सैन्याची शिस्त भंग पावू लागली. कित्येक सैनिकांची सैन्य सोडून जाण्याची तयारी दिसू लागली. रशियन सैन्याधिपती अँड ड्यूक निकोलस यांना ताबडतोब मास्कोस बोलाविण्यात आले. त्यांची पाठ फिरल्याबरोबर रशियन सैन्य विस्कळीत झाले.