पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशी कमालपाशांनी या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन आपल्या लहान सैन्यासह एकदम हल्ला चढविला. रशियन सैन्य अगोदरच विस्कळीत व नाराज झाले होते. त्यांत हा तुकचा हल्ला झाल्याबरोबर रशियन सैन्याची दाणादाण झाली. कालपाशांनी शत्रूने घेतलेले सर्व प्रांत परत मिळविले. रशियन संकट दूर होते न होते तोंच तुर्कस्थानच्या दक्षिण भागांत नवेंच संकट उपस्थित झाले. इंग्रज सैन्याचा सिरीयामधून हल्ला करण्याचा विचार आहे अशी बातमी येऊन थडकली. ताबडतोब कमालपाशांनी सैन्याची सर्व सूत्रे कझीम कारा बेकीर यांच्या हवाली केली नि सिरीयाकडे जाण्याकरितां कॉन्स्टॅटिनापलचा रस्ता सुधारला. कपालपाशा सिरीयामध्ये येऊन पोहोचेपर्यंत इंग्रजांनी हिंदी लष्कराचे साहाय्याने बगदादचा ताबा देखील घेतला होता. इंग्रजांशी लढून, बगदाद पुन्हा मिळविण्याची महनीय कामगिरी कमालपाशा यांचेवर येऊन पडली होती. त्याकरितां जनरल व्हॉन फकनहॅन या जर्मन अधिका-यांशी सहकार्य करण्याबद्दल कमाल पाशांना युद्धमंत्र्याची आज्ञा झाली. त्या ठिकाणी असलेले तुक सैन्य त्या जर्मन अधिका-यांच्या हुकमतीखाली होते. ही परिस्थिती पाहताच कमालपाशांना फार उद्वेग वाटला. जर्मन अधिकान्याच्या हुकमतीखाली वागण्याचे त्यांनी साफ नाकारले. तेथील परििस्थतीचे