पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गझिी कमालपाशा कमालपाशांना कॉकेशस सरहद्दीकडे पाठविण्यात आले. तिकडे जावयास वाहान नव्हते की रस्ते नीट नव्हते ! तरी मोठ्या मुष्कलीन कमाल सरहद्दावर येऊन पोहोचले तेथे येऊन पहातांत तो तीच नेहमींची गैरव्यवस्था ! तेच नालायख लष्करी अधिकारी ! ते ठिकाण इतके लांब होते की, त्या ठिकाणी दुसरे कार्यक्षम अधिकारी मागविणे अशक्यच होते. कमालपशांनी त्याच अधिका-यांना योग्य शिक्षण देऊन सबंध सैन्याची पुनर्घटना केली. रशियन सैन्य रस्ते व रेल्वे बांधत सावकाश पुढे सरकत होते. त्यांनी तुकची प्रमुख ठाणी आपल्या कवज्यांत घेतली होती. इरझरूमचा प्रख्यात किल्लाही त्यांच्या हाती पडला होता. रशियाच्या विराट सैन्याला तोंड द्यावयास आपले सैन्य असमर्थ आहे हे कमाल यांनी ताबडतोब आळखले. शिवाय, तुर्की सैन्याजवळ अन्नाचा तुटवडा होता;; बंदुका, तोफा व गोळ्यांचा साठा नव्हता; उत्साह तर पार मावळूनच गेला होता. औषधपाण्याची सोय नसल्यामुळे हजारों सैनिक दोपी तापाने व आमांशाने मरत होते. त्यांनी ताबडतोब ही सर्व हकीकत राजधानीमध्ये असणाच्या मुख्य युद्धकचेरीस कळवि; पण युद्धकचेरीहून कांहींच उत्तर आले नाही किंवा दारुगोळ्याचा व औषधपाण्याचा ८०