पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महायुद्धांत व इंग्रजांशी मोठ्या धैर्याने लढून,त्यांना जमिनीवर उतरू दिले नाहीं. डिसेंबर १९१५मध्ये अनाफर्ता घ्यावयाचा नाद सोडून इंग्रजांचे सैन्य परत फिरले. अशारीतीने कमालपाशांनी शत्रूला पूर्णपणे हुसकून लावून अभूतपूर्व अशा विजय मिळविला. यदाकदाचित् या युद्धांत इंग्रजांचा जय झाला असता तर इंग्रजांनी सरळ चुनक बेअरपासून अनाफतोपर्यंत मुलूख काबीज करून दादनेलीसचा ताबा घेतला असता. दादनेलिसचा ताबा म्हणजे तुर्कस्थानचा मृत्यु होता. दादनेलीस ताब्यात असल्यानंतर लगेच इंग्रजांचे निशाण तुर्कस्थानच्या राजधानीवर-कॉन्स्टॅटिनोपलवर मोठ्या डौलाने फडकले असते. इंग्रजांचा पराभव करून कमालपाशा कॉन्स्टॅटिनोपल येथे परत आले. राज्यधानीत प्रवेश केल्याबरोबर कानठळ्या बसेपर्यंत कमालपाशांचा जयजयकार करण्यांत आला. ' राष्ट्रवीर ? म्हणन त्यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव होऊ लागला. दादानेलीसचा व राजधानीचा रक्षणकर्ता म्हणून वर्तमानपत्रांतून त्यांच्या पराक्रमाची रोमांचकारक वर्णनं येऊं लागली. तुर्कस्थानचा सुपुत्र ह्मणून त्यांचा ठिकठिकाणीं गौरव होऊ लागला. कमालपाशा यांचा सत्कार चालू असतां, काकेशस पर्वताकडे रशियन सैन्याची चढाई होत असल्याची वार्ता आली. ताबडतोब ७९