पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशी व तुकची हातघाई सुरू झाली. प्रेतांचा खच पडू लागला. तुर्की सैन्याने इंग्रजांच्या सैन्याला समुद्रापर्यंत रेटीत नेले. समुद्रामधीः इंग्लीश आरमारानें तोफांचा मारा सुरू केल्यामुळे, तुर्की सैन्याने खंदक खोदून आश्रय घेतला. अशारीतीने इंग्रजांच्या सैन्याला आपल्या प्रदेशामधून हुसकून लावून कमालांनी आणीबाणीचा प्रसंग मोठ्या शिताफीने व भैयाने टाळला. या अतुल पराक्रमःबद्दल कमाल यांना * पाशा ' ही मानाची पदवी मिळाली. तेव्हांपासून कमाल हे • कमालपाशा ' या नावाने ओळखले जाऊ लागले. काबीज करण्याचा इंग्रजांचा बेत फसल्यावर त्यांनीं सुल्वा उपसागरामधून अनाफत काबीज करण्याचा बेत चालविला. कमालपाशांना ताबडतोब अनाफर्ताच्या आघाडीवर पाठविण्यांत आले. कमालपाशा आघाडीवर येऊन पाहतात तो तुर्की सैन्य अगदीं विस्कळीत झालेले त्यांना दिसून आले. त्यांनी ताबडतोब सैन्याची संघटना करून उत्कृष्ट शिस्त लावून दिली. दोन वेळां इंग्रजांनीं सुल्वा उपसागरामधून तुकवर हल्ला केला. प्रत्येक वेळी भयंकर युद्ध होऊन दोघांचेही असंख्य सैनिक मारले गेले. कमालपाशांजवळ मनुष्यबळ फार कमी होते, पण त्यांनी आपल्या प्रभावी वाणीने आपल्या थोड्याशा सैन्यांत नवचेतना निर्माण केली ७८