पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महायुद्धांत तेथून आल्याबरोबर मध्यरात्रीपर्यंत कमाल पुढील हल्लयाची आंखणी करीत बसले होते. त्यांनी सर्व सैन्य आघाडीच्या खंदकांमध्ये जमविले व त्या सैन्यास उद्देशून म्हणाले, “ माझ्या तरुण वीरांनो, घाई करूं नका. हल्ला केव्हा करावयाचा हे ठरवून मी खंदकाच्या बाहेर पडेन मी हात वर केल्याबरोबर संगीनी खोवून माझ्या मागोमाग या. विजय आपला आहे हे लक्ष्यांत ठेवा. आज तुम्हीं जो पराक्रम कराल त्यावर तुमचे पुढचे यश अवलंबून आहे हे लक्ष्यात ठेवा. ठरल्यावेळी प्रत्येक तुर्की ताफ शत्रूवर रोखली गेली व शत्रूवर जबरदस्त मारा सुरू झाला. पहांटे बरोबर तीन वाजतां । कमाल खंदकाबाहेर आले. इंग्रजांच्या सैन्यानही बंदुकीच्या गोळ्यांचा मारा सुरू केला. त्यापैकी एक गोळी कमाल यांच्या रिस्टवॉचवर आदळली व त्यामुळे त्या घड्याळ्याच्या ठिकन्या ठिकन्या झाल्या. सुदैवाने कमाल यांना कांहीं इजा झाली नाहीं. तोफखान्याचा मारा बंद झाला. कमाल यांनी हात वर करतांच संगीनी घेतलेले असंख्य तुझी सैनिक खंदकामधून बाहेर पडले व कम्गल याच्या मागून जाऊ लागले. शत्रू सैन्याजवळ जातांच तु सैन्याने संगीनीचा हल्ला चढविला. अकस्मात हल्ला व तोही अंधारात झाल्यामुळे इंग्रजांचे सैन्य गोंधळून गेले. इंग्रजांची ७७