पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा कुमक आली. या नवीन सैन्यास थोडा वेळ विश्रांती दिल्यानंतर, लढण्यास तयार राहण्यासाठी कमाल यांनी हुकूम दिला. ही नवीन कुसक आल्यामुळे तुर्की सैन्य मोठ्या उमेदीने लढू लागले. या सैन्याने इंग्रजांच्या सैन्याला समुद्रालगत होजाचमनपर्यंत मागे रेटले. या वेळी इंग्रजाकडून लढणाच्या हिंदी सैन्याने आपल्या पराक्रमाची शर्थ केली. हिंदी सैन्याचा पराक्रम पाहून, तुर्की सैन्य स्तिमितच झाले. हिंदी सैन्याने पुन्हां तुर्की सैन्यावर चाल केली. इतक्यांत इंग्लीश आरमाराने आपला तोफखाना सुरू केला; पण, त्या तोफांचा मारा तुर्कवर होण्याऐवजी इंग्रज आणि हिंदी पलटणीवरच होऊं लागला. त्यामुळे इंग्लीश व हिंदी सैन्य गोंधळून गेले व त्यांनी माघार घेतली. तोफांच्या माध्यामुळे त्याचे अतिशय नुकसान झाले. ई रात्री ८ वाजता आपल्या छावणीमधून कमाल एकटेच बाहेर पडले. शत्रूच्या जागेची पाहणी करण्याचा त्यांचा बेत होता. ' आपण यावेळी एकटे जावू नका' असे त्यांच्या हाताखालील अधिका-यांनी परोपरीने सांगितले; पण ते त्यांनी ऐकले नाहीं. ते बाहेर पडल्याबरोबर दोन गोळ्या सू सू करीत त्यांच्या बाजूने निघून गेल्या, तरी न डगमगतां शत्रुच्या जागेची पहाणी करून ते परत फिरले.