पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महायुद्धांत ते सैन्याच्या आघाडीवर, गोळ्यांच्या मान्यांत, बेदरकारपणे उभे राहात. त्यांच्या सभोवार मुडदे पडत; पण, त्यांना चुकून देखील गोळी लागत नसे.एक दिवस आपल्या खंदकाच्या बाहेर बसले होते, तोच आस्ट्रेलियन तोफांचा मारा सुरू झाला. प्रत्येक गोळा त्यांच्या बाजूला येऊन फुटत होता. त्यांच्या हाताखालील अधिका-यांनी आश्रयार्थ बाजूला येण्याबद्दल कमाल यांना विनंति केली. कमाल शांतपणे म्हणाले, '६ आश्रय घेणे ह्मणजे सैनिकांना वाईट घडा देण्यासारखे आहे. इतकें बोलून त्यांनी सिगारेट पेटविली व संथपणे हवेत धुराचे लोट सोडावयास सुरवात केली. आगस्ट ७ तारखेप्त ऑस्ट्रेलियन सैन्यास इंग्रजाकडून कुमक मिळाली. पुन्हां जोरदार युद्ध सुरू झाले. तुर्की सैन्याने आपल्या पराक्रमाची शर्थ केली; पण, ऑस्ट्रेलियन व इंग्रजांच्या सैन्यांसमोर त्यांचा निभाव लागेना. तुर्की सैन्याचा अधिकारीवर्ग गोंधळून गेला व मार्गे संरकरण्याची भाषा बोलू लागला. कमाल हे धैर्याचे मेरू होते.काडीमात्र न डगमगतां किंवा हताश न होता, अग्निगोलकांच्या वर्षावांत ते आपल्या अधिका-याना नि सैनिकांना प्रोत्साहन देत उभे होते. त्यांचा धीरोदात्त स्वभाव पाहून, त्यांच्या सैनिकांच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. मरूं किंवा मारूं, या आवेशाने ते निकराने लढू लागले. इतक्यांत बुलेरहून आणखी तुर्की सैन्याची ७५