पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाई कमाल [1Y यन सैन्य मागे हटले नाहीं. दोघेही एकमेकांस हटवू शकत नाहीं हे पाहून दोघांनीही खंदक खोदणेस सुरवात केली. कित्येक आठवडे खंदकामधूनच लढाई चालली होती. दोन्ही बाजूच्या सैनिकांना रात्रीच्या रात्री जागून काढाव्या लागत. रात्री संगीनींचा हल्ला केव्हां होईल याची कांहींच खात्री नव्हती. बाँब वर्षावामुळे दोन्ही बाजूच्या खंदकांत प्रेतांचा खच पडत होता. थोड्याच दिवसांत कडक उन्हाळा सुरू झाला. पाण्याची अतिशय टंचाई भासू लागल्यामुळे, सैनिकांचे अतिशय हाल होऊ लागले. दोन्ही सैन्यांच्यामध्ये पडलेली शेते कुजून, त्यावर मोठ्या माशा बसू लागल्या. त्याच भाशा अन्नावरून वावरू लागल्यामुळे हगवण, अमांश, विषमज्वर वगैरे रोग सैनिकांत मोठ्या प्रमाणांत फैलावू कागले. दोन्ही सैन्यांची प्रतिकारशक्त कमजोर झाली. इतकी अवस्था झाली तरी कमाल यांच्या चेह-यावर काडीमात्र काळजी दिसेना. त्यांचा चेहरा सदैव उमेदीने भरलेला दिसे. ते फार झोंप घेत नसत. आपल्या अधिका-यांना घेऊन, ते रात्रंदिवस सैनिकांमधून फिरत. जे हुकूम द्यावयाचे ते अत्यंत काळजीपूर्वक व अभ्यासपूर्वक देत असत. कित्येक वेळेला शत्रू सैन्याची पहाणी करण्याकरितां आपली हद्द ओलांडून धोक्याच्या जागी जाण्यास त्यांना काडीमात्र भीती वाटत नसे. हातघाईची लढाई सुरू असतां ७४