पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महायुद्धांत कारेतां आरमार सज्न आहे अशा बातम्या कैरो व अथेन्सहून । आल्या. व्हॉन साँडर्सला मोठा पेच पडला. गॅलीपोली द्वीपकल्याचा समुद्रकिनारा ९२ मैल लांब होता. इंग्रजांचे ५० हजार सैन्य कुठे उतरेल याचा नेम नव्हता. तुर्की सैन्य अवघे ६० हजार होते. साँडसन वीस वीस हजार सैनिकांच्या तीन तुकड्या करून इंग्लिश सैन्याचा प्रतिकार करण्याचे योजिले, रविवार २९ तारखेला इंग्रजांचे सैन्य येऊन थडकले. त्यापैकी एका तुकडीने द्विपकल्पाच्या उत्तर बाजूस,दुसच्या तुकडीने दक्षिण बाजूस हल्ला चढवला. मध्यावर आस्ट्रेलीयन सैन्याने मुख्य हल्ला केला. या भागाचा कमाल सांभाळ करीत होते. आस्ट्रेलीयन सैन्याचा चुनक बेअर नांवाचे महत्वाचे लष्करी ठाणे घेण्याचा बेत दिसतांच, कमाल यांनी आपले सैन्य प्रतिकारार्थ चुनक बेअरकडे नेले. त्यांच्या हातांत नकाशा होता; त्या नकाशाकडे पाहून ते आपल्या सैन्यास आज्ञा फर्मावित होते. शत्रूसमीप आहे असे दिसताच त्यांनी शत्रूसैन्यावर हल्ला करण्याचा हुकूम दिला. दिवसभर आस्ट्रेलीयन सैन्य व तुर्की सैन्य यामध्ये भयंकर युद्ध चालले होते. तोफांच्या माच्या पुढे उभे राहून जातीने कमाल आपल्या सैनिकांस प्रोत्साहन देत होते. आस्ट्रेलीयन सैन्याला मागे समुद्रापर्यंत रेटण्याची तुर्की सैन्याने शिकस्त केली; पण आस्ट्रेली- - ७३