पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाल्कन राष्ट्रांचा हल्ला । भडका उडाला. तुर्की राष्ट्राने जर्मनीची बाजू घेऊन लढण्याचे जाहीर केले असे कळतांच, कमाल यांना अतिशय वाईट वाटले. कुठल्याही बाजूस न पडतां तटस्थ राहण्यांतच तुर्कस्थानचे कल्याण आहे असे त्यांनी आपले मत व्यक्त केले.लढाई थोड्याच आठवड्यांत संपेल असा सर्वांचा कयास होता; पण जसजसे जास्त दिवस लोटू लागले तसतशी कमाळ यांची अस्वस्थता वाटू लागली. लढाई चालू असतां आपण स्वस्थ बसून राहावे ही कल्पना त्यांना सहन होईना. त्यांनी रणांगणावर जाण्याची परवानगी मागितली; पण * आपण आहांत ' तेथेच रहा, असे अनवरपाशांकडून उत्तर आल्यामुळे ते हात चोळीत स्वस्थ बसले. शेवटीं रजा न घेतां कॉस्टॅटिनोपल येथे जावे असा त्यांनी विचार केला, इतक्यांत कॉन्स्टेंटिनोपलमध्ये हजर व्हा असा हुकूम त्यांच्या हातांत आला. ।