पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशी अँड्रीयानोपलच्या विजयानंतर कमाल राजधानीस परत आले. त्यांच्या पराक्रमाबद्दल त्यांना लेफ्टनंट कर्नलचा हुद्दा मिळाला. युद्धमंत्र्याची जागा अनवरपाशा यांना देण्यात आली. सैन्याची पुनर्घटना करण्यासाठी अनवरपाशांनी जनरल लिमान व्हॉन साँडर्स या जर्मन तज्ज्ञाला पाचारण केले. ही बातमी ऐकल्याबरोबर कमाल यांना संताप आला व त्यांचा जाज्वल्य स्वाभिमान जागृत झाला. * तुर्की सैन्याची पुनर्घटना करण्यास आपण तुर्क समर्थ आहोत. त्याकरिता जर्मनीची मदत घेणे ही लाजीरवाणी गोष्ट आहे. या गोष्टीचा प्रत्येकाने निषेध करावा,' अशी कमाल यांनी चळवळ चालविली.

  • आमचे सैन्य ही आमच्या राष्ट्राची शक्ति आहे. या शाक्तवर नियंत्रण ठेवावयास जर्मनीला परवानगी द्यावी हा निव्वळ वेडेपणा आहे. आमचा प्रश्न आम्हींच सोडविला पाहिजे. हा प्रश्न सोडविण्याकरितां जर्मनीची मदत मागावी हा राष्ट्राचा अपमान आहे,' अशा स्पष्ट शब्दांत कमाल यांनी आपला निषेध प्रगट केला. त्यांनी या बाबतींत अनरपाशांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश न येतां, सोफीयास बदली केल्याचा हुकूम मात्र त्यांच्या हाती पडला.

हुकूमानुसार कमाल यांनी सोफयाकडे प्रयाण केलें, सोफीयामध्ये जाऊन फार दिवस होतात न तोंच युरोपमध्ये महायुद्धाचा ७०