पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाल्कने राष्ट्राचा हल्ला होऊ द्यावयाची नाहीं; ' असे त्यांनी ठरविले. या दोन तटामध्ये भयंकर चुरस लागून राहिली. इतक्यांत अनवर ट्रिपोलीहून आले. त्यांनी ' संघ आणि प्रगतीच्या सभासदांना व तरुण अधिका-यांना आपल्या विश्वासांत घेतले आणि ज्याठिकाणीं मंत्रिमंडळाचा तहाबाबत विचारविनिमय चालला होता त्याठिकाणी ते आपल्या साथीदारांसह एकदम घुसले. अनवर व त्यांचे साथीदार पाहतांच मंत्रिमंडळाची गाळण उडाली. अनवरपाशांनीं युद्धमंत्री नजीम यांना गोळी घालून ठार केले व हातांत रिव्हॉल्व्हर घेऊन कामालपाशा व इतर मंत्री यांचा पाठलाग केला. पण सुदैवानें कामीलपाशा व इतर मंत्री अनारपाशीच्या तडाख्यांतून वाचले. विलंब न लावतां, अनवरपाशांना तह करूं इच्छिणाच्या पुढान्यांना पकडून फांसावर चढविले, अंतस्थ । कलह मिटविले आणि बाल्कन राष्ट्रांच्या अपमानास्पद अटी लाथाडून टाकल्या. अनवरपाशांनी सर्व सैन्य जमविले व अॅड्रयानोपलकडे कूच केले. कमाल त्यांच्याबरोबर होतेच. तुर्की सैन्याने बल्गेरीयन सैन्याचा पराभव केला व अंड्रयानोपल आपल्या ताब्यात घेतले. शहरांत ज्यावेळी अनवर व कमाल यांनी प्रवेश केला त्यावेळी नागरिकांनी त्यांच्यावर फुले उधळली.