पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशी त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी पडली होती. बल्गेरियन सैन्यास थोपवून धरण्यांत थोडी कुचराई झाली तर दादनेलीसवर बल्गेरियन सैन्याचा ताबा ठरलेलाच. दार्दानेलीसचा ताबा घेऊन आशियांतील तुर्कस्थानावर आघात करणेचा बल्गेरियन सैन्याचा बेत होता. कमाल यांनी मोठ्या धैर्याने बल्गेरियन सैन्यास तोंड दिले. शत्रू सैन्याने तुर्की सैन्याची फळी फोडण्याचा प्रयत्न केला; पण कमाल यांच्या योग्य बंदोबस्तामुळे व प्रभावी नेतृत्वामुळे त्यांना यश आले नाहीं. कित्येक दिवस दोघांमध्ये घनघोर रणसंग्राम चालू होता. इतक्यांत तहाची भाषा सुरू झाल्यामुळे तो संग्राम तहकूब झाला. युरोपांतील मोठ्या राष्ट्रांनी शांतता--परिषद बोलावून युद्ध संपविण्याचा बेत केला. परिषदेमध्ये बाल्कन राष्ट्रांनी अव्वाच्या सव्वा मागण्या पुढे केल्या, फक्त राजधानी वगळून युरोपमधील तुर्कस्थान आपसांत वाटून घेण्याचा सर्व बाल्कन राष्ट्रांचा डाव होता, तुर्की पुढा-यांत दोन तट पडले. तुर्कस्थानचे मुख्य वजीर कामीलपाशा यांच्या बाजूचे पुढारी, • काय वाटेल ते होवो; तुर्कस्थाननें तह हा केलाच पाहिजे,' अशा मताचे होते. याच्या उलट एकजात तरुण पुढारी या बुढ्या वजीराविरुद्ध होते. • वाटेल ते झाले तरी शरण जावयाचे नाही किंवा तुर्कस्थानची चीरफाड ६८