पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाल्कन राष्ट्रचा हल्ला की काय याचा तपास कमालांनी केली. शेवटी त्यांना आपल्या आईचा व बहिणीचा पत्ता एका ठिकाणी लागला.यावेळी त्यांच्या आईचा वृध्दापकाळ झाला होता व त्यांना नीट दिसतही नव्हते. सलानिकाहून येतांना त्या मायलेकींचे अतिशय हाल झाले. कित्येक दिवस त्या थंडीत कुडकुडत उपाशी होत्या. कमाल यांना पाहतांच त्या माऊलीचे अंतःकरण भरून आले. त्यांनी कमालांचे प्रेमभराने चुंबन घेतले. आपला मुलगा पाहिल्यावर त्यांना झालेल्या हालअपेष्टांचा व उपासमारीचा विसर पडला. कमाल यांनी शहरामध्ये ताबडतोब एक घर घेऊन, तेथे आपल्या वृध्द आईला व बहिणीला ठेवले. सलानिकाच्या पराभवाबद्दल जुबेदा यांच्या मनावर आतशय परिणाम झाला होता. सलानिका इस्लामच्या कट्टया शत्रूंच्या हाती पडले, त्यांच्या नातेवाईकांची अत्यंत क्रूरपणे कत्तल झाली, त्यांचे घर जमनदोस्त केले गेले, त्यांचेजवळ होते ते सर्व लुटले गेले; त्यांचा सत्यानाश झाला! एका खोलीत त्या एकट्याच विषण्ण अंतःकरणाने नि भरलेल्या डोळ्यांनी गतगोष्टींचा विचार करीत बसत व अनन्यभावानें अलाची करुणा भाकीत. दानेलासच्या रोखाने येणा-या बल्गेरियन सैन्यास तोंड देत असलेल्या सैन्याचे मुख्य म्हणुन कमाल यांची नेमणूक झाली, ६७