पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा म्हणावयास सैफ नांवाच्या नाविक कमांडरने हामिदिया नांवाचे लढाऊ जहाज, दादनेलीसच्या तोंडावर असलेली शत्रूची कोंडी फोडून, बाहेर नेले व समुद्रांत त्याने शत्रूच्या अनेक बोटी बुडविण्याचा सपाटा चालविला. पण तुर्कचा सगळीकडे मोठ्या प्रमाणांत पराभव होत होता, त्यामुळे सैफचा असामान्य पराक्रम निष्प्रभ ठरला. - राजधानीत तर विषण्णतेची छाया पसरली होती. दवाखाने, मशिदी,चर्च, खासगीवाडे जखमी लोकांनी भरून गेले होते. शत्रूच्या तडाख्यांतून निसटून पळून आलेल्या लोकांनी सबंध शहर भरून गेले होते. लोकांची अन्नानदशा झाझी होती, हजारों लोक कॉलरा व विषमज्वराने मरत होते, असंख्य लोक थंडी नि भूक यांना बळी पडत होते. वस्त्रहीन लोकांचे तांडेच्यातांडे रस्त्यांतून फिरत होते. जिकडे पहावे तिकडे म्लान व विषण्ण चेहरे दृष्टीस पडत. सानिका ग्रीकांच्या ताब्यात गेल्यामुळे तेथील हजारों लोक आश्रयार्थ राजधानीमध्ये आले होते.ग्रीक लोकांनी हातीं सांपडलेल्या तुकची एकजात कत्तल केली आणि तुकची जेवढी ह्मणून मालमत्ता होती ती लुटून नेली. हे हृदयद्रावक वर्णन त्या लोकांच्या तोंडून । ऐकून कमाल यांना मनस्वी दुःख झाले. सलानिकामध्ये त्यांची आई व बहीण रहात होती. त्या मायलेकी राजधानीत आल्या आहेत ६६