पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण प्रकरण ९ दें। -xx बाल्कन राष्ट्रांचा हल्ला >>६८s तुर्कस्थानावर सर्व बाल्कन राष्ट्रांनी एकदम हल्ला चढविला आहे हे ऐकतांच कमाल ताबडतोब तुर्कस्थानाकडे येण्याकरिता निघाले. तुर्कस्थानामध्ये येऊन पाहतात तो सगळीकडे एकच हाहाःकार उडालेला दिसून आला. सर्व सरहद्दवर तुर्की सैन्याने मार खाल्ला होता. सर्वियाचे सैन्य विनासायास उत्तरेकडून पुढे सरकत होते, दक्षिणेकडून ग्रीक, सैन्याने हल्ला चढवून सलानिका आपल्या ताब्यात घेतले होते; इतकेच नव्हे तर, २५००० तुर्की सैनिकांना कैद केले होते. बल्गेरियाचे सैन्य सरळ कॉन्स्टॅटिनोपलचे रोखाने तुर्की राजधानांपासून अवघ्या १६ मैलांवर नेऊन ठेपले होते, फक्त राजधानींत व अॅड्रीयानोपलच्या किल्लयांत कांहीं तुर्क होते; बाकी सर्व तुकची युरोपमधून उचलबांगडी झाली होती. जिकडे पहावे तिकडे तुकची लांडगेतोड ! पराभव ! ! नाहीं