पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाली कमालपाशा व कमाल यांच्या नेतृत्वाखालीं तुर्की सैन्याने त्यांना थोपवून धरले. तुर्की सैन्य थोडे होते; पण मुसलमानांनी व्यापलेला संबंध उत्तर आफ्रिका त्यांचेमागे होता. आपल्या तुर्की मुसलमान बंधूना मदत करण्याकरितां लिबियापासून तो सहारां वाळवंटाच्या मुलुखापर्यंत सर्व मुसलमान टोळ्या मोठ्या उत्साहाने जमल्या. अनवर पाशानी या पराक्रमी मुसलमान लोकांना एकत्र जमवून; त्यांच्या ४ ० तुकड्या केल्या व प्रत्येक तुकडीबरोबर ३ तुर्की अधिकारी दिले. ते तुर्की अधिकारी सांगतील त्या प्रमाणे सर्वांनी ऐकावयाचे असा इषारा दिला.या प्रचंड जनसमुदायाचा अनवर पाशांनी योग्य उपयोग करून घेतला. जवळजवळ एक वर्षभर इटालियन व तुर्की लोकांचे युद्ध चालले होते; पण सबंध वर्षांत तुर्की सैन्याने इटालियन सैन्याला एक इंचभरही पुढे सरकू दिले नाहीं. इतक्यांत दुर्दैवाने आक्टोबर १९१२ मध्ये सर्व बाल्कन राष्ट्रांनीं तुर्कस्थानविरुध्द युद्ध पुकारले. त्यामुळे घाईघाईने तुर्की सरकारने इटलीशी तह करून, इटलीच्या हातावर ट्रिपोलीचे उदक सोडले व आपले सर्व सैन्य त्या प्रदेशामधून काढून घेतले. -